विशेष प्रतिनिधी
मुंबई : खूप काही पुरावे आहेत. ते मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देणार आहे. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करणार आहे या भेटीत मी सर्व ब्रम्हास्त्र काढणार असल्याचा इशारा u मुंडे यांच्या पहिल्या पत्नी करुणा शर्मा यांनी दिला आहे. Karuna Sharma
धनंजय मुंडे आणि भाजपचे आमदार सुरेश धस यांची भेट झाल्यानंतर राजकारण तापले आहे. या पार्श्वभूमीवर करुणा शर्मा म्हणाल्या, खूप खालच्या पातळीवर जाऊन राजकारण सुरु आहे. गेल्या 3 महिन्यांपासून जातपात न बघता, समाज न बघता, पक्ष न बघता, सुरेश धस, जितेंद्र आव्हाड, संदीप क्षीरसागर, बजरंग सोनावणे एकत्र लढले .आतापर्यंत वाल्मिक कराड आणि संतोष देशमुख यांच्या हत्येचा मुद्दा धरून चालत होते . जितेंद्र आव्हाड आणि सुरेश धस यांच्यामध्ये वाद पेटवण्याचा काम कोणीतरी केलंय. Karuna Sharma
Nilesh Rane : उद्धव ठाकरे यांची पक्ष सांभाळायची कुवत नाही, निलेश राणे यांची टीका
-मला वाटतं धनंजय मुंडे यांनी सुरेश धस यांना बोलावून घेतलं आणि नंतर अशी बातमी पसरवली असा दावा करत करुणा शर्मा म्हणाल्या, संतोष देशमुख यांच्या हत्येकडे दुर्लक्ष करण्याचं काम सुरु आहे.बीडमध्ये मनाचा कारभार सुरू आहे. धनंजय मुंडेंपेक्षा मोठे नाव आज गुंडगिरी मध्ये वाल्मिक कराडचं झालं आहे. याला पाठबळ ही धनंजय मुंडेंचं आहे. भागीरथ बियाणी प्रकरण आहे, मर्डर केस आहेत त्या बाहेर निघतील .
राष्ट्रवादी पक्षात धनंजय मुंडे बोलतात तेच होतं असा आरोप करत करुणा शर्मा म्हणाल्या , हा अजित पवार गट नसून धनंजय मुंडे गट आहे-. ही सर्व खेळी धनंजय मुंडेंची आहे. कधी कधी अजित पवार पण शांत फार्म हाऊसवर जाऊन बसतात, त्यांना पुन्हा आणायचं काम ही धनंजय मुंडे करतात. जे धनंजय मुंडे बोलतात तेच राष्ट्रवादीत होतं
संतोष देशमुख यांनी मरताना पाणी मागितलं तर यांनी तोंडावर लघुशंका केली. हे लोक म्हणतात सत्तेपुढे शहाणपण चालत नाही. मी म्हणते जनतेपुढे राजकारण चालत नाही.