विशेष प्रतिनिधी
मुंबई : माणिकराव कोकाटे यांना विधिमंडळाचे कामकाज सुरू असताना मोबाइलवर रमी खेळणे भोवले असल्याचे समोर आले आहे. माणिकराव कोकाटे यांचे कृषी खाते बदलून त्यांना क्रीडा खाते देण्यात आले आहे. विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती, परंतु कोकाटे यांचे खाते बदल करण्यात आले आहे. कोकाटे यांच्या कृषिमंत्री पद काढून घेण्याच्या भूमिकेवर ठाम राहून रमीचा डाव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच उधळला असल्याची चर्चा आहे. Dattatreya Bharane
माणिकराव कोकाटे हे राज्याचे कृषिमंत्री होते. परंतु, विधिमंडळ कामकाजात मोबाइलवर रमी खेळतानाचा व्हिडिओ शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी व्हायरल केला होता. त्यानंतर विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यानंतर कोकाटे यांनी आपण रमी खेळत नसल्याचे सांगितले होते. आता त्यांच्या जागी दत्तात्रय भरणे यांना कृषिमंत्री पद देण्यात आले असून माणिकराव कोकाटे यांना क्रीडा खाते देण्यात आले आहे.
वसाळी अधिवेशन सुरू असताना मंत्री माणिकराव कोकाटे हे विधानसभेत मोबाईलवर रमी खेळत होते. त्याचा व्हिडीओ रोहित पवारांनी पोस्ट केला होता. त्यानंतर माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा द्यावा यासाठी विरोधकांनी सरकारवर दबाव टाकला होता. परंतु कोकाटे यांचा राजीनामा न घेता फक्त त्यांच्या खात्यामध्ये बदल करण्यात आला आहे.
आतंकवाद भगवा न कभी था, ना है और ना…मालेगाव बाँबस्फोट निकालावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
कोकाटे यांच्याकडील खात काढून घेण्यापूर्वी दत्तात्रय भरणे यांनी सूचक विधान करत कृषि खातं त्यांच्याकडे येणार असल्याचे संकेत दिले होते. कृषी खात्याच्या संदर्भात मला अजून तरी काहीही माहिती नाही. मात्र, बारामतीकर न मागता सगळं देतात. मला कारखान्यात, जिल्हा परिषद, आमदारकी आणि मंत्रिमंडळात न मागता संधी दिली. त्यामुळे कोण काय करतं हे वरिष्ठांना सगळं माहिती असतं असे भरणे म्हणाले होते.
दोन दिवसांपूर्वी मंत्रिमंडळ बैठकीत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व मंत्र्यांना धारेवर धरत त्यांचे कान टोचले होते. यात फडणवीसांनी मंत्र्यांना वादग्रस्त विधानं, कृती अजिबात खपून घेतली जाणार नाही, असे प्रकार होत राहिले तर, सरकारी प्रचंड बदनामी होते. त्यामुळे ही अखेरची संधी, काय कारवाई ती करूचं असेही फडणवीसांनी सांगितले. तसेच यापुढे एकही प्रकार खपवून घेणार नसल्याची तंबीही फडणवीसांनी सर्व मंत्र्यांना दिली होती.
Kokate Now Has Sports and Youth Welfare, Dattatreya Bharane Is New Agriculture Minister
महत्वाच्या बातम्या
- Sadhvi Pragya Singh : भगव्या रंगाला बदनाम करणाऱ्यांना देवच करेल शिक्षा, साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचा संताप
- एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्यासह पाच जणांना न्यायालयान कोठडी, जामीनाचा मार्ग मोकळा
- बांग्लादेशीयांची बोगस प्रमाणपत्रे रद्द करण्यासाठी टास्कफोर्स, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती
- Praniti Shinde : प्रणिती शिंदे यांच्या तमाशा शब्दावर मुख्यमंत्र्यांचा जाेरदार हल्लाबाेल, हा तर भारतीय सैन्याचा अपमान