विशेष प्रतिनिधी
पुणे: कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यातील हवालदाराने लाच स्वीकारताना ‘एसीबी’च्या पथकासमोर तक्रारदाराच्या छातीचा चावा घेऊन पळण्याचा प्रयत्न केला होता. गणेश शहाजी कस्पटे (बक्कल नं. २७८१) या हवालदाराला पोलीस दलातून निलंबित करण्यात आले आहे.
पोलीस उप आयुक्त (परिमंडळ ५) राजलक्ष्मी शिवणकर यांनी गुरुवारी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशानुसार यासंदर्भातील आदेश निर्गमित केले.
हवालदार कस्पटे हा कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात समन्स आणि वॉरंट बजावण्याचे काम पाहत होता. एका जुन्या प्रकरणात मदत करण्यासाठी त्याने यापूर्वी ५ लाख रुपये घेतले होते आणि पुन्हा दीड लाख रुपयांची लाच स्वीकारताना त्याला रंगेहात पकडण्यात आले. शासकीय सेवक असूनही त्याने दाखवलेली ही ‘बेशिस्त, बेजबाबदार आणि पोलीस खात्याची प्रतिमा मलीन करणारी’ वर्तणूक निलंबनासाठी कारणीभूत ठरली आहे.
कस्पटे विरुद्ध कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यासह भारतीय न्याय संहितेतील खालील गंभीर कलमांचा समावेश आहे. कस्पटे याने कर्तव्यात सचोटी न राखता भ्रष्टाचाराला खतपाणी घातल्याने, त्याच्याविरुद्ध आता स्वतंत्र विभागीय चौकशीही सुरू करण्यात आली आहे.
Koregaon Park Police Station’s Bribe-Taking Constable Ganesh Kaspate Suspended
महत्वाच्या बातम्या
- सुनेत्रा पवारांनी देशातील सर्वात मोठ्या मताधिक्याचा रेकॉर्ड मोडला
- सुनेत्रा पवारांनी मोडला अजितदादांचा 2024मधील विक्रम; १ लाख १२ हजार २६८ मतांनी आघाडीवर
- विजयचा दणका, स्टॅलिन यांच्यासह द्रमुक मंत्रिमंडळातील 32 पैकी 31 मंत्री पिछाडीवर
- बंगाल-आसाममध्ये भाजपची झेप; तामिळनाडूत थलपती विजयच्या पक्षाची ‘ब्लॉकबस्टर’ एन्ट्री, केरळमध्ये काँग्रेसला दिलासा