Munaf Pathan : कृष्णा आंदेकरचा शुटर मुनाफ पठाण आहे तरी कोण ?

Munaf Pathan : कृष्णा आंदेकरचा शुटर मुनाफ पठाण आहे तरी कोण ?

Munaf Pathan

विशेष प्रतिनिधी 

पुणे : Munaf Pathan गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला पुण्यातील नानापेठेत आयुष कोमकर याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आणि संपूर्ण पुणे या घटनेने हादरले. आज (ता.१८) या हत्या प्रकरणातील फरार आरोपी मुनाफ पठाणला अखेर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.



५ सप्टेंबरच्या संध्याकाळी पुण्यातील नाना पेठेत गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला आयुष कोमकरचा खून झाला. मागच्या वर्षी याचदरम्यान झालेल्या वनराज आंदेकरच्या खुनाचा बदला, म्हणून आयुष कोमकरची हत्या घडवून आणली होती. त्यानंतर या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांनी जंग जंग पछाडलं आणि वेगवेगळ्या प्रकारचे ट्रॅप लावले. विविध पद्धतीने शोध घेत, वेगवेगळ्या शहरांमधून पोलिसांनी सर्व आरोपींना ताब्यात घेतलं. Munaf Pathan

यात पोलिसांनी “कृष्णाची माहिती दे, नाहीतर त्याचा एन्काउंटर होईल,” असं सांगत कृष्णा आंदेकर भोवती फास लावला आणि जीवाच्या भीतीने कृष्णा पुणे पोलिसांपुढे सरेंडर झाला. कृष्णा ताब्यात आल्यानंतर या प्रकरणाच्या तपासाला आणखीनच वेग आला. त्यातूनच आता पोलिसांनी आयुष कोमकर हत्या प्रकरणात फरार असलेल्या आरोपी मुनाफ पठाणला ताब्यात घेतलं. गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला अटक केली, आणि न्यायालयात हजर केलं.

या प्रकरणाच्या तपासात उघड झालेल्या माहितीनुसार आयुष कोमकरच्या हत्येसाठी मुनाफ पठाण यानेच पिस्तुल पुरवले होतं. त्यामुळेच आता या प्रकरणी त्याच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा शार्प शूटर असलेला मुनाफ पठाण म्हणजे कुख्यात गुंड कृष्णा आंदेकरचा अगदी जवळचा सहकारी आहे. त्यामुळेच जिथे जिथे कृष्णा आंदेकर धुमाकूळ घालतो आणि आपली दहशत निर्माण करतो, त्या बहुतांश ठिकाणी मुनाफ पठाण हा सोबतच असतो. Munaf Pathan

यातच हा मुनाफ पठाण स्वत:च एक शार्प शुटर असल्याकारणाने आंदेकर टोळीला शस्त्र पुरवणे, गोळीबार घडवून आणणे, शस्त्राचा धाक दाखवून लोकांकडून कामं करून घेणं किंवा वसुली करणं हे याच्यासाठी अगदी सोपं काम होतं. यापूर्वी देखील २०२१ मध्ये जेव्हा पुण्यातील कोंढवा परिसरात आंदेकर टोळीने दहशत माजवली होती, अन् तिथे मोठ्या प्रमाणात गोळीबार झाला होता. तेव्हाच पोलिसांनी कृष्णा आंदेकरच्या बरोबरीने या मुनाफ पठाणवर देखील मकोका अंतर्गत कारवाई केली होती.

मुनाफ पठाण म्हणजे आंदेकर टोळीतला एक महत्वाचा शुटर, आणि कृष्णा आंदेकरचा अगदी जवळचा सहकारी होता. म्हणूनच जेव्हा कृष्णा आंदेकरने आपल्या भावाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी भाच्याच्या खुनाचा कट रचला. तेव्हा त्या हत्येच्या कटात मुनाफ पठाण अगदी सुरुवातीपासून सामील होता. त्यानेच आयुषच्या मारेकऱ्यांना पिस्तुल पुरवून शस्त्र पुरवठा केला आणि त्याच पिस्तुलातील ९ गोळ्या लागून आयुषच्या शरीराची अक्षरश: चाळणी केली. Munaf Pathan

आता या मुनाफ पठाणला पोलिसांनी न्यायालयात हजर केलं आहे. त्यामुळे आता त्याच्यावर काय कारवाई होईल? तसंच या प्रकरणाच्या तपासात आणखी काय धागेदोरे सापडतील? ते येत्या काही दिवसात समोर येईलच. Munaf Pathan

Krishna Andekar’s shooter is Munaf Pathan, but who is he?

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023