विशेष प्रतिनिधी
मुंबई : महिला दिनानिमित्ताने लाडक्या बहिणींना महायुती सरकारकडून मोठी भेट मिळणार आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा एकत्र हप्ता 8 मार्चला महिला दिनी मिळणार आहे, अशी माहिती महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यभरातील लाभार्थी महिलांना राज्य सरकारकडून दर महिन्याला १,५०० रुपये दिले जात आहेत. तटकरे यांना सर्वप्रथम लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याविषयी प्रश्न विचारल्यावर येत्या आठ मार्च रोजी जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून विधीमंडळाचं विशेष सत्र होणार आयोजित करण्यात आलं आहे. याच दिवशी दोन्ही महिन्यांचा एकत्रित हप्ता दिला जाईल.
तटकरे म्हणाल्या, “येत्या आठ मार्च रोजी विधीमंडळाचं विशेष सत्र होणार आहे. त्या दिवशी शनिवार असूनही हे सत्र होणार. खास महिला लोकप्रतिनिधिंसाठी व राज्यातील महिलांसाठी हे सत्र असेल. याशिवाय राज्यातील जनतेची लाडकी योजना म्हणजेच ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’बाबतही महत्त्वाची माहिती जनतेला द्यायची आहे. लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता येत्या आठ मार्च रोजी वितरीत केला जाणार आहे.
महिला दिनाच्या पूर्वसंध्येला सर्व लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होईल. येत्या पाच ते सहा मार्चपर्यंत योजनेचा लाभ वितरित करण्याची प्रक्रिया सुरू होईल. येत्या आठ मार्च रोजी योजनेचे पैसे थेट महिलांच्या खात्यात उपलब्ध करून देणार आहोत. महिला दिनाचं औचित्य साधून आम्ही आठ मार्च रोजी गेल्या महिन्याचा हप्ता वितरित करत आहोत.
Ladki Bahin yojna will get two months’ installment on Women’s Day
महत्वाच्या बातम्या
- Devendra Fadnavis गतिमान आणि प्रगतीशील कायदा-सुव्यवस्था उभी करणार! अमित शहा यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस यांची बैठक
- Russia : ”रशियाने युक्रेनमधील चेर्नोबिल पॉवर प्लांटवर हल्ला केला”
- PM Modi : पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यामुळे भारत-अमेरिका व्यापार संबंध अधिक मजबूत
- Manipur : मणिपूरमधील कॅम्पमध्ये सीआरपीएफ जवानाने केला गोळीबार अन् नंतर…