पुरंदर विमानतळासाठी भूसंपादनाला वेग; पहिल्याच दिवशी ४५० एकर जमिनीचा करार..

विशेष प्रतिनिधी

पुणे: जिह्यातील पुरंदर येथील छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू झाली आहे.पहिल्याच दिवशी तब्बल ४५० एकर जमिनीचा करार झाल्याची माहिती समोर आली आहे.जिल्हा प्रशासनाकडून ‘ प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य ‘ या तत्वावर ही संपूर्ण प्रक्रिया राबवली जात आहे.करारावर स्वाक्षरी होताच मोबदल्याची पूर्ण रक्कम लगेच दिली जाईल,असे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले आहे.

पुरंदर सात गावांमध्ये उभारल्या जाणाऱ्या या विमानतळ प्रकल्पाकडे राज्याचा विकासाच्या दृष्टीने महत्वाचे मानले जात आहे.त्यामुळे सरकारकडून सरकारकडून भूसंपादन प्रक्रिया सुरळीत आणि कोणताही वाद निर्माण न होऊ देता पूर्ण करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत.



५ मे रोजी राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी आणखी मोठे आणि आकर्षक ‘ पॅकेज ‘ जाहीर केले.यानुसार जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति एकर १ कोटी ६१ लाख रुपयांचा मोबदला देण्यात येतोय.विमानतळाच्या शेजारी विकसित होणाऱ्या ‘ एरोसिटी ‘ प्रकल्पांमध्ये १० टक्के भूखंड संबंधित शेतकऱ्यांना दिला जाणार आहे.त्यामुळे भविष्यातील विकसित होणाऱ्या व्यवसायात शेतकऱ्यांना भागीदारी मिळणार आहे. विमानतळामुळे बाधित झालेल्या प्रत्येक कुटुंबातील एका सदस्याला रोजगाराची संधी देण्याचे आश्वासन देखील सरकारकडून देण्यात आले आहे.

विमानतळीसाठी जमिनी जाणारी गावे..

उदाचीवाडी ५८.३३ हेक्टर जमीन, वनपुरी १५४.०६ हेक्टर जमीन, कुंभारवळणातील २५४.४८ हेक्टर जमीन, खानवडी २६९.२२ हेक्टर जमीन, मुंजवाडी ८२.५६ हेक्टर जमीन, एकहतपूर १९९.०३ हेक्टर जमीन आणि पारगावमधील १८८.०७ एकर जमीन .

Land acquisition for Purandar Airport accelerates; Agreement for 450 acres of land signed on the first day

महत्वाच्या बातम्या