आवाज जाणीवपूर्वक माॅर्फ, माळी समाजाबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याचा लक्ष्मण हाके यांचा इन्कार

आवाज जाणीवपूर्वक माॅर्फ, माळी समाजाबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याचा लक्ष्मण हाके यांचा इन्कार

विशेष प्रतिनिधी

बीड : माळी समाजाबाबत आपण काेणतेही वादग्रस्त वक्तव्य केलेले नाही.ओबीसी समाजात फूट पाडण्यासाठी माझ्या व्हिडिओमध्ये दुसऱ्याचा आवाज जाणीवपूर्वक माॅर्फ करण्यात आला आहे, असा आराेप ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केला आहे.

ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये हाके यांनी ओबीसींच्या नेतृत्वावरून माळी आणि धनगर समाजात वाद असल्याचे वादग्रस्त विधान केल्याचे समोर आले आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये लक्ष्मण हाके म्हणतात, ओबीसींचे नेतृत्व माळ्यांकडून धनगरांकडे आल्याने माळी समाजाच्या पोटात दुखत आहे. यासोबतच, छगन भुजबळ यांची दोन्ही मुलं काही कामाची नाहीत आणि त्यांनी कुठल्याही कार्यकर्त्याला पुढे येऊ दिलं नाही,

या व्हायरल व्हिडिओवर लक्ष्मण हाके म्हणाले की, मी असे कोणतेही विधान केलेले नाही. माझा व्हिडिओ वापरून कुणीतरी हा ऑडिओ जोडला आहे. हा व्हिडिओ मॉर्फ (मॉर्फिंग) केलेला आहे. ओबीसी समाजात फूट पाडण्याच्या उद्देशाने हा व्हिडिओ जाणीवपूर्वक व्हायरल करण्यात आला आहे.

ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी लक्ष्मण हाके यांनी महाराष्ट्रात ‘ओबीसी संघर्ष यात्रा’ काढणार असल्याची घोषणा केली आहे. या अनुषंगाने ते मराठवाड्यात बैठका घेत आहेत. आमचे आंदोलन जरांगेंच्या आंदोलनाला काउंटर म्हणून नाही. मुंबईत जाऊन ट्रॅफिक जाम करण्याऐवजी प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन केले जाईल. आमचे आंदोलन संविधानाला धरून असेल आणि व्यवस्थेला आव्हान देणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

हाके यांनी जरांगे पाटील यांच्यावर गंभीर आरोप करताना म्हटले की, जरांगेंचा मराठा आरक्षण मागण्याचा डाव ओबीसी आरक्षण संपवण्याचा आहे. त्यांना आरक्षणाचे काही पडले नसून, निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ते मुंबईला निघाले आहेत.

Laxman Hake denies making controversial statement about Mali community, deliberately morphing voice

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023