देशाला प्राधान्य कसे द्यावे याचे धडे अफगाणिस्तानकडून घ्या, प्रियंका चतुर्वेदी यांनी सुनावले

देशाला प्राधान्य कसे द्यावे याचे धडे अफगाणिस्तानकडून घ्या, प्रियंका चतुर्वेदी यांनी सुनावले

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि केंद्र सरकारने खेळापेक्षा देशाला प्राधान्य कसे द्यावे, याचे धडे अफगाणिस्तानकडून घ्यावेत, असे खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी सुनावले आहे. Priyanka Chaturvedi

पाकिस्तानने युद्धविरामाची सहमती मोडून अफगाणिस्तानच्या पक्तिका प्रांतात हवाई हल्ले केले, असा आरोप तालिबानने केला आहे. यात अफगाणिस्तानचे तीन क्रिकेटपटू ठार झाले आहेत. हल्ल्यानंतर अफगाणिस्तानने पाकिस्तानविरुद्ध होणारी T-20 मालिका रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यावरून ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी देशाला कसे प्राधान्य द्यायचे, हे अफगाणिस्तानकडून शिका, असा टोला केंद्र सरकार आणि बीसीसीआयला लगावला आहे.

प्रियांका चतुर्वेदी यांनी अफगाणिस्तानकडून देशप्रेम शिकण्याचा सल्ला केंद्र सरकार आणि बीसीसीआयला देताना म्हटले आहे की, पाकिस्तानची व्यवस्था काही भ्याड लोकांनी बनलेली आहे. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने पाकिस्तानसोबतचे त्यांचे मालिका सामने रद्द केल्याचे पाहून आनंद झाला. कदाचित बीसीसीआय आणि भारत सरकार खेळांपेक्षा देशाला प्राधान्य कसे द्यायचे याबद्दल टिप्स घेऊ शकतील. पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय संघ पाकिस्तानविरुद्ध आशिया कप स्पर्धेत खेळला.



तेव्हा पाकिस्तानविरुद्ध खेळण्याच्या सरकारच्या निर्णयावर विरोधकांनी बीसीसीआय, केंद्र सरकार आणि आयसीसीवर सडकून टीका केली होती. व्यावसायिक फायद्यासाठी राष्ट्रीय हिताशी तडजोड केल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. या स्पर्धेत भारताने पाकिस्तानला हरवून आशिया कप जिंकला आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला होता. शिवाय पाकिस्तानी संघाशी शेक हँड करण्यासही भारतीय संघाने नकार दिला होता.

मात्र, भारताचे 26 पर्यटक मारल्यानंतरही भारतीय क्रिकेट संघ पाकिस्तानशी खेळला होता. म्हणूनच बीसीसीआय आणि केंद्र सरकारने पहिले प्राधान्य देशाला द्यायला हवे. खेळापेक्षा देशाला प्राधान्य कसे द्यावे हा धडा अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाकडून घ्यायला हवा, असा सल्ला प्रियंका चतुर्वेदी यांनी दिला आहे. त्याचवेळी श्रीलंका संघानेही या मालिकेतून माघार घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

Learn from Afghanistan how to prioritize the country, says Priyanka Chaturvedi

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023