विशेष प्रतिनिधी
सातारा : Udayanraje Bhosale विरोधकांनी भाजपवर टीका करण्यापूर्वी स्वतःच्या कार्यपद्धतीकडे आणि भूतकाळातील चुका पाहाव्यात. जनतेचा विश्वास आणि मतं हेच भाजपला सत्तेत आणणारे खरे घटक आहेत, असा सल्ला खासदार उदयनराजे भाेसले (Udayanraje Bhosale) यांनी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना दिला.
कराड येथे पत्रकारांशी संवाद साधताना उदयनराजे (Udayanraje Bhosale) यांनी उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केलेल्या तीव्र टीकेवर प्रत्युत्तर दिले. मुंबईतील निर्धार मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी भाजपवाले भुरटे चोर आहेत, असा थेट आरोप केला होता. या वक्तव्यावरउदयनराजे म्हणाले की, मी ठाकरेंचं संपूर्ण भाषण पाहिलं नाही, पण त्यांनी काय म्हटलं ते त्यांचं मत असू शकतं. मात्र जर लोकांनाही तसंच वाटलं असतं, तर भारतीय जनता पक्षाला पुन्हा सत्तेवर बसवलं गेलं नसते. त्यामुळे प्रत्येकाने बोलण्याआधी विचार करायला हवा. आपण जेव्हा कोणाकडे बोट दाखवतो, तेव्हा तीन बोटं आपल्याकडेच वळलेली असतात. राजकारणात टीका करणं सोपं आहे, पण तथ्य मांडणं आणि पुराव्यासह बोलणं महत्त्वाचं आहे. मी कोणाचं बोलणं थांबवू शकत नाही, पण आधाराशिवाय आरोप करणं हे योग्य नाही.
http://youtube.com/post/UgkxGJKFKs3V8pz7dLRKoNfVaMJB2LbkJls_?si=H1CXoZ3qpCuiuQ2_
फलटणमधील महिला डॉक्टरच्या आत्महत्येच्या प्रकरणावरून माजी भाजप खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्यावर सुरू असलेल्या आरोपांवर बाेलताना उदयनराजे (Udayanraje Bhosale) म्हणाले की, आरोप करणं ही सर्वात सोपी गोष्ट आहे, पण तपास पूर्ण होण्याआधी निष्कर्ष काढणं योग्य नाही. कायदा आणि न्यायसंस्था आपलं काम करत आहेत, त्यांना काम करू द्या. कोणीही दोषी ठरवायचा असेल तर पुराव्यांच्या आधारे ठरवावे. तरुणीला न्याय मिळवून देण्यासाठी मी स्वतः प्रयत्न करणार आहे. तिच्या कुटुंबाच्या वेदना मला समजतात. सत्य बाहेर यावं. आम्ही गप्प बसणार नाही.
Look at your own work methods and past mistakes, Udayanraje’s advice to Uddhav Thackeray
महत्वाच्या बातम्या
- महिला डॉक्टरची आत्महत्या नसून संस्थात्मक हत्या, राहुल गांधी यांचा आरोप
- धंगेकर अन्यायविरोधात लढणारा कार्यकर्ता, पण आपल्याला महायुतीत दंगा नको, एकनाथ शिंदे यांची भूमिका
- मुरलीधर मोहोळांनी विशाल गोखलेंसाठी केला पदाचा गैरवापर, १९७ कोटींचा हवाई घोटाळ्याचा रवींद्र धंगेकरांचा आरोप
- पुण्यात जमिनीचा मोठा धिंगाणा, मुरलीधर मोहोळ यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेण्याची विजय वडेट्टीवार यांची मागणी



















