विशेष प्रतिनिधी
पुणे : सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी गणेशोत्सवात सात दिवस रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक लावण्याची परवानगी दिली. त्यावर आम्हाला विश्वासात न घेताच अशी परवानगी का दिली? असा सवाल एका ८० वर्षांच्या पुणेकर विलास लेले यांनी केला आहे. शेलार यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच सरन्यायाधीश भूषण गवई यांच्याकडे तक्रार केली आहे.
कोणत्याही ध्वनिक्षेपकाला रात्री १० नंतर वाजवण्यास सर्वोच्च न्यायालयानेच बंदी घातली आहे. विशिष्ट डेसिबलपर्यंतच ध्वनीची मर्यादाही घालून दिली आहे. त्यात राज्य सरकारने बदल करून काही वर्षांपूर्वी उत्सवातील अखेरचे तीन दिवस रात्री १२ वाजेपर्यंत परवानगी दिली. ती त्यानंतर ५ दिवस करण्यात आली. आता तर ध्वनिक्षेपक रात्री १२ वाजेपर्यंत वाजवण्यास ७ दिवस परवानगी दिली आहे.लेले यांनी म्हटले आहे की, आधीच दहीहंडी व अन्य उत्सवांमध्ये आमची स्थिती जगतो की वाचतो अशी होते. त्यात आता लेसर दिव्यांची भर पडली आहे.
कल्याणकारी राज्य म्हणून या अनिष्ट व उत्सवाशी काहीही संबंध नसलेल्या गोष्टींना आळा घालण्याचे सोडून सरकारच त्याची तरफदारी करते आहे, हे अयोग्य आहे. कोणीही मागितली नसताना ७ दिवसांची परवानगी दिली गेली. यात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन आहे. शेलार यांनी याचे उत्तर द्यावे व ते न देतील तर त्यांना उत्तर देण्यास भाग पाडावे, अशी मागणी लेले यांनी आपल्या पत्रात केली आहे. मंत्री शेलार यांना याचे उत्तर देण्यास भाग पाडावे म्हणून एक स्वतंत्र विनंतीपत्रही सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवले आहे.
शेलार यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात गणशाेत्सवाच्या काळात चाैथा व नववा दिवस साेडून सर्व दिवशी रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनिक्षेपकास परवानगी दिल्याची घाेषणा केली हाेती. त्यामुळे गणेश मंडळांमध्ये उत्साहाचे वातावरण असले तरी काही पुणेकरांनी मात्र त्यावर नाराजी व्यक्त केली आहे.
Loudspeakers allowed till midnight during Ganesh festival, Pune resident complains to Chief Minister Ashish Shelar, Chief Justice
महत्वाच्या बातम्या
- ब्राझीलच्या राष्ट्रपतींचा PM मोदींशी संवाद; म्हणाले होते- मी ट्रम्पशी नाही तर मोदींशी बोलेन
- AI Avatar ब्रिटनचा पहिला ‘व्हर्च्युअल खासदार’: नागरिकांशी संवाद साधण्यासाठी खासदाराचा AI अवतार
- National Herald Case : नॅशनल हेराल्ड केस- राऊस अव्हेन्यू कोर्टात पुन्हा सुनावणी; आरोपपत्रावर कोर्टाने ईडीकडून मागितले स्पष्टीकरण
- Putin : पुतीन या वर्षाच्या अखेरीस भारत दौऱ्यावर येणार; रशियाकडून तेल खरेदीमुळे ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लादला