विशेष प्रतिनिधी
अकोले :Madhukar Pichad भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री मधुकरराव पिचड (वय ८३) यांची प्रकृती अत्यवस्थ आहे. पहाटेच्या सुमारास पिचड यांना ब्रेनस्ट्रोक आल्याची माहिती आहे. Madhukar Pichad
राजूर इथं राहत्या घरी त्यांना ब्रेन स्ट्रोक आला. त्यानंतर नाशिकच्या नाइन पल्स रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले आहे. पाच वर्षांपूर्वी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर मधुकर पिचड यांनी सुपुत्र वैभव पिचड यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. मात्र काहीच दिवसांपूर्वी त्यांनी शरद पवार यांच्याशी गाठीभेटी वाढवल्याने ते पुन्हा पवारांच्या राष्ट्रवादीत येण्याच्या चर्चांना सुरुवात झाली होती.
khadakwasla : भाजपच्या बालेकिल्ल्यात अजित पवारांचा गनिमी काव्याचा प्रयत्न
मधुकरराव पिचड यांनी १९८० ते २००४ या काळात अकोले विधानसभा मतदारसंघातून विधानसभेचे आमदार म्हणून सलग सात वेळा काम केले आहे. मार्च १९९५ ते जुलै १९९९ या काळात ते महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते आहेत. मधुकर पिचड राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य होते, परंतु २०१९ मध्ये त्यांनी त्यांचा मुलगा वैभव पिचड यांच्यासह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणूनही काम पाहिले होते.
Madhukar Pichad in hospilization
महत्वाच्या बातम्या