विशेष प्रतिनिधी
बीड: Manoj Jarange महादेव मुंडे यांचा खून होऊन दीड वर्ष उलटले तरी देखील तपास लागला नाही. मुख्यमंत्र्यांना गुंडच पोसायचे आहेत का? आता या प्रकरणात येत्या 25 तारखेपर्यंत एसआयटी नियुक्त करावी अन्यथा बीडसह राज्यभरात आंदोलन करण्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.Manoj Jarange
मनोज जरांगे पाटील यांनी परळी येथे महादेव मुंडे कुटुंबीयांच्या निवासस्थानी भेट घेत त्यांचे सांत्वन केले. यावेळी मयत महादेव मुंडे यांच्या कुटूंबियांना अश्रू अनावर झाले. आपण या प्रकरणात अंतिम क्षणापर्यंत लढून महादेव मुंडे यांना न्याय मिळवून देऊ, असे जरांगे म्हणाले.
पत्रकारांशी बोलताना जरांगे पाटील म्हणाले, एक बांधव सांगतोय की महादेव मुंडे यांच्या मांसाचा तुकडा एका व्यक्तीने नेवून टेबलवर ठेवला. मुंडे कुटुंबीयांनीही यावरून अनेक आरोप केले आहेत. तरी देखील आरोपी अटक होत नाहीत. या प्रकरणात जे कोण पोलिस अधिकारी, कर्मचारी होते, त्यांचे कॉल डिटेल्स देखील तपासायला हवेत, आता मी या प्रकरणात लक्ष दिले आहे, काय काय होते ते तुम्हाला दिसेल, असे जरांगे पाटील म्हणाले, येत्या 25 तारखेपर्यंत एसआयटी नियुक्त न झाल्यास राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते, खासदार बजरंग सोनवणे थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांचा न्यायासाठी संघर्ष सुरू आहे. मात्र सरकार चालढकल करीत असल्याचा आरोप करून ज्ञानेश्वरी मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात आत्महत्येचा प्रयत्न केला. याच पार्श्वभूमीवर थेट केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेऊन न्याय द्यावा, अशी मागणी बजरंग सोनवणे करणार आहेत
Mahadev Munde murder: Demand for SIT by 25th, Manoj Jarange warns of state-wide agitation
महत्वाच्या बातम्या
- Sanjay Shirsat : संजय शिरसाट यांच्या अडचणी संपेनात! सामाजिक न्याय खात्यात 1500 कोटींच्या टेंडर घोटाळ्याचा आरोप
- jayant patil : राजीनाम्यावर मौन सोडताना जयंत पाटील यांचे भाजप प्रवेशावर भाष्य
- Kaustubh Dhavase : मुख्यमंत्र्यांच्या गुंतवणूक व धोरण मुख्य सल्लागारपदी कौस्तुभ धवसे यांची नियुक्ती
- Shiv Sena dispute : शिवसेनेतील वादावर तीन महिन्यात निकाल, पक्ष आणि धनुष्य बाण चिन्हाचा होणार फैसला