विशेष प्रतिनिधी
मुंबई : छोट्या छोट्या घटनांवरुन महाराष्ट्र पेटवला जात आहे. घरं पेटवली जात आहेत, दंगे भडकवले जातात आणि अशा वातावरणात निवडणुका लढवल्या जातात, अशी महाराष्ट्राची सध्याची परिस्थिती आहे. मात्र असा महाराष्ट्र कधीच नव्हता,” अशी टीका शिवसेना ठाकरेगटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील यवत या गावामध्ये शुक्रवारी हिंसाचार भडकला. गाड्यांची मोडतोड आणि जाळपोळ करण्यात आली. सामानाची नासधूस करण्यात आली. आक्रमक जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना अश्रुधूराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. यावर राऊत म्हणाले की, छोट्या-छोट्या घटनांवरुन महाराष्ट्रात दंगे भडकत आहेत. घरं पेटवली जात आहेत. असा महाराष्ट्र कधी नव्हता.
आतंकवाद भगवा न कभी था, ना है और ना…मालेगाव बाँबस्फोट निकालावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
वातावरणात तणाव निर्माण करायचा, धार्मिक विद्वेष निर्माण कायचा आणि मग अशा पद्धतीने समाजात विष पसरवून निवडणुकीला समारं जाययं. हे फक्त महाराष्ट्रात नाही तर देशभरात भारतीय जनता पक्षाचं राष्ट्रीय धोरण ठरलेलं आहे, अशी टीका करत राऊत म्हणाले, दौंड हा औद्योगिक भाग आहे. बाहेरच्या लोकांची तिथे गुंतवणूक आहे, अशा वेळेस यवतसारख्या घटना घडत राहिल्या तर याला जबाबदार कोण? पोलीस काय करत आहेत? मुख्यमंत्री काय करत आहेत? महाराष्ट्रात कोणाचं राज्य आहे?
दौंड तालुक्याती यवत येथे एका व्यक्तीने सोशल मीडियावर स्टेटस् ठेवल्यावरुन वाद निर्माण झाल्याचे पुण्याचे पोलीस अधीक्षक संदीप गिल म्हणाले. शुक्रवारी दुपारनंतर गावातील दोन गट आमने-सामने आले. त्यांच्यात दगडफेक सुरु झाली. त्यानंतर जाळपोळ करण्यात आली. पोलिसांनी दगडफेक करणाऱ्यांची ओळख पटवून त्यांना ताब्यात घेतले. शुक्रवारी आठवडी बाजार असतो तो बंद ठेवण्यात आला. दुसरीकडे यवतमध्ये दुचाकी पेटवण्यात आल्या. आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शनिवारी सकाळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला. जमावाला पांगवण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडण्यात आल्या. आता यवतमधील परिस्थिती नियंत्रणात आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, आक्षेपार्ह पोस्ट करणारा तरुण यवतच्या सहकार नगर भागात राहतो. पोस्टनंतर संतप्त जमावाने त्याच्या घराची तोडफोड केली. यावेळी काही लोकांनी एका धार्मिक स्थळावर दगडफेकही केली. यामुळे तणाव वाढला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे पुढील अनर्थ टळला. या घटनेचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले.
Maharashtra is being set on fire over small incidents, Sanjay Raut criticizes Yavat incident
महत्वाच्या बातम्या
- Sadhvi Pragya Singh : भगव्या रंगाला बदनाम करणाऱ्यांना देवच करेल शिक्षा, साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचा संताप
- एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्यासह पाच जणांना न्यायालयान कोठडी, जामीनाचा मार्ग मोकळा
- बांग्लादेशीयांची बोगस प्रमाणपत्रे रद्द करण्यासाठी टास्कफोर्स, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती
- Praniti Shinde : प्रणिती शिंदे यांच्या तमाशा शब्दावर मुख्यमंत्र्यांचा जाेरदार हल्लाबाेल, हा तर भारतीय सैन्याचा अपमान