विशेष प्रतिनिधी
मुंबई : नवी मुंबई एअरपोर्ट जवळ तिसरी आणि वाढवण जवळ चौथी मुंबई होणार आहे. मोदीजी तुम्ही महाराष्ट्राच्या पाठी पहाडासारखे उभे राहता. त्यामुळे महाराष्ट्र पुढे जात आहे. महाराष्ट्र आता थांबणार नाही. आगामी काळात या भागात तिसऱ्या आणि चौथ्या मुंबईची उभारणी होणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले. यावेळी बाेलताना मुख्यमंत्री म्हणाले, 40 किलोमीटरची अंडरग्राउंड मेट्रो देखील वेगवेगळेअडथळे पार पाडत नरेंद्र मोदी यांच्या आशीर्वादाने पूर्ण झाली आहे. देशातील सर्वात मोठी अंडरग्राउंड मेट्रो आपण मुंबईत तयार करू शकलो, याचा मला अभिमान आहे.
एकनाथ शिंदे यांनी सांगितल्याप्रमाणे यात अनेक अडथळे आले. अनेक अडथळ्याची शर्यत पार करत आम्ही या मेट्रोचे काम पूर्ण करू शकलो. याचे कारण या प्रत्येक क्षणाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आमच्या पाठीशी होते. केंद्र सरकार पाठीशी उभे असल्यामुळेच हे सर्व अडथळे पार झाले.
फडणवीस म्हणाले, दहा वर्षात जी कामे झाली नव्हती, ती सर्व कामे नरेंद्र मोदी यांच्या एका बैठकीमध्ये पूर्ण झाली. हे केवळ एक विमानतळ नाही तर महाराष्ट्र आणि भारताच्या विकासामध्ये महत्त्वाची भूमिका निभवणार आहे. हा एकच एअरपोर्ट महाराष्ट्राचा जीडीपी एक टक्क्यांनी वाढवण्याची क्षमता ठेवतो. यातून महाराष्ट्र मोठ्या प्रमाणात पुढे जाणार असल्याचा दावा फडणवीस यांनी केला आहे. हे विमानतळ पूर्ण होण्यापूर्वीच अटल सेतू तयार झाला आहे. या देशातील पहिले एअरपोर्ट आहे, ज्याला वॉटर टॅक्सीची कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. त्यामुळे त्याला ट्रॅफिक असणार नाही. थेट गेट वे ऑफ इंडिया पर्यंत जाता येईल, अशा पद्धतीची व्यवस्था करण्यात आली आहे.
Maharashtra will not stop now, believes Chief Minister Devendra Fadnavis
महत्वाच्या बातम्या
- Vijay Vadettiwar : काॅंग्रेसवर टीका करणाऱ्या जरांगे पाटील यांचा बोलवता धनी कोण? विजय वडेट्टीवार यांचा सवाल
- Devendra Fadnavis : शेतकऱ्याला पुन्हा उभे करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून माेठ्या पॅकेजची घाेषणा
- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे पुणेकरांसाठी नव्या संधींचे द्वार , मुरलीधर मोहोळ यांचे प्रतिपादन
- बनावट पासपोर्ट प्रकरणी नीलेश घायवळसह काढून देण्यासाठी मदत करणाऱ्या दोघांविरुद्धही गुन्हा