विशेष प्रतिनिधी
नागपूर : देशातील माओवाद विराेधातील चळवळीतील सगळ्यात माेठे यश महाराष्ट्रात मिळाले असून कट्टर माओवादी भूपतीसह 61 माओवादी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमक्ष आत्मसमर्पण करणार आहेत.
महाराष्ट्र-छत्तीसगड सीमावर्ती भागातील दंडकारण्यात गेली अनेक वर्षे माओवादी चळवळीचा चेहरा असलेला वरिष्ठ जहाल नेता मल्लोजुला वेणुगोपाल ऊर्फ भूपती ऊर्फ सोनू गडचिरोली पोलिसांसमोर भामरागड येथे शरण आला. तब्बल ६० सहकाऱ्यांसह त्याने आत्मसमर्पण केले. बुधवारी १५ ऑक्टोबरला मुख्यमंत्री व पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर शस्त्र खाली ठेवून तो हाती संविधान घेणार आहे.
भूपतीने युद्धबंदीचा प्रस्ताव ठेवला होता, यावरून माओवादी चळवळीतील त्याचे केंद्रीय नेतृत्वाशी त्याचे मतभेद झाले हाेते. जानेवारी २०२५ मध्ये भूपतीची पत्नी व केंद्रीय समिती सदस्य विमला सिडाम ऊर्फ तारक्काने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आत्मसमर्पण केले होते. त्यानंतर अनेक जहाल माओवाद्यांनी शरणागती पत्करत शस्त्र सोडून हाती संविधान घेतले. भूपतीदेखील शरणागतीच्या तयारीत असल्याची चर्चा होती.
अखेर त्याने ६० सहकाऱ्यांसह आत्मसमर्पण केल्याची माहिती आहे. दंडकारण्याच्या घनदाट जंगलात चार दशकांपासून टिकून असलेल्या माओवादी चळवळीचा हा शेवटचा टप्पा ठरू शकतो. यामुळे गडचिरोली जिल्हा माओवादमुक्त होण्याची आशा व्यक्त केली जात आहे.
माओवादी भूपतीवर १० कोटी रुपयांचे बक्षीस आहे. तो महाराष्ट्र, तेलंगणा, छत्तीसगड, ओडिशा आदी राज्यांत मोस्ट वाॅण्टेड होता
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज बुधवारी साेलापूर येथे विमानतळाचे उद्घाटन हाेते. मात्र, हा कार्यक्रम टाळून मुख्यमंत्री गडचिराेलीकडे रवाना झाले.
Major success in the fight against Maoism, 61 Maoists will surrender before the Chief Minister
महत्वाच्या बातम्या
- Vijay Vadettiwar : काॅंग्रेसवर टीका करणाऱ्या जरांगे पाटील यांचा बोलवता धनी कोण? विजय वडेट्टीवार यांचा सवाल
- Devendra Fadnavis : शेतकऱ्याला पुन्हा उभे करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून माेठ्या पॅकेजची घाेषणा
- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे पुणेकरांसाठी नव्या संधींचे द्वार , मुरलीधर मोहोळ यांचे प्रतिपादन
- बनावट पासपोर्ट प्रकरणी नीलेश घायवळसह काढून देण्यासाठी मदत करणाऱ्या दोघांविरुद्धही गुन्हा