विशेष प्रतिनिधी
नाशिक : Manikrao Kokate drags Rohit Pawar to court : तत्कालीन कृषी मंत्री माणिकराव काेकाटे विधीमंडळात कथितपणे रमी खेळत असल्याचा व्हिडिओ ट्विट करत आराेप करणे राष्ट्रवादी काॅंग्रेस शरद पवार गटाचे आमदार राेहित पवार यांच्या अंगाशी येण्याची शक्यता आहे. काेकाटे यांनी राेहित पवार यांच्या विरुध्द मानहानीचा दावा केला आहे. या प्रकरणी कोर्टात झालेल्या सुनावणीत कोकाटेंनी रोहित पवार यांना मी नेमका रमीच खेळत होतो हे कशावरून? असा सवाल केला आहे.
रोहित पवार यांनी विधिमंडळ अधिवेशन सुरू असताना एक व्हिडिओ पोस्ट केला होता. त्यात तत्कालीन कृषिमंत्री माणिकरावर कोकाटे कथितपणे ऑनलाईन रमी खेळताना दिसून येत होते. त्यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर महायुती सरकारवर टीकेची झोड उठली होती. अखेर सरकारने कोकाटेंकडील कृषि मंत्रालय काढून ते दत्तात्रय भरणे यांच्याकडे दिले होते. तसेच कोकाटे यांच्याकडे क्रीडा मंत्रालयाचा पदभार सोपवण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर माणिकराव कोकाटे यांनी रोहित पवार यांच्याविरोधात वकील मनोज पिंगळे यांच्यामार्फत अब्रुनुकसानीचा फौजदारी दावा दाखल केला आहे.
या दाव्यावर बुधवारी नाशिक न्यायालयात कोर्टात सुनावणी झाली. त्यात कोकाटे यांच्या वकिलांनी माझे अशील रमीच खेळत होते हे कशावरून? व्हायरल व्हिडिओ मॉर्फ केला नसेल हे कशावरून? असे विविध प्रश्न रोहित पवार यांना केले. यावेळी झालेल्या संक्षिप्त सुनावणीनंतर कोर्टाने संबंधितांना नोटीस बजावत सुनावणी पुढील तारखेपर्यंत तहकूब केली.
उल्लेखनीय बाब म्हणजे कोकाटे यांनी काही दिवसांपूर्वी यापूर्वी रोहित पवार यांना नोटीस बजावली होती. त्यानंतर रोहित यांनी संतप्त सुरात मानहानीची एवढी काळजी होती तर पत्ते खेळण्याचे कुटाणे केलेच कशाला? असा सवाल केला होता. माजी कृषिमंत्र्यांचा सभागृहात पत्ते खेळतानाचा व्हिडीओ जगजाहीर केला म्हणून मला मानहानीच्या दाव्याची नोटीस आलीय. कोकाटे साहेब तुमचा काळ आला होता पण वेळ आली नव्हती, त्यामुळे एवढे मोठे कांड करूनही वाचलात. मानहानीची एवढी काळजी होती तर पत्ते खेळण्याचे कुटाणे केलेच कशाला? शेतकऱ्यांप्रती असलेला आपला कळवळा आणि आपण केलेले पराक्रम सांगण्याची वेगळी गरज नाही.
तुम्ही पाठवलेली नोटीस मजेशीर आहे, नोटीस वाचून हसू आवरता आले नाही. पण लक्षात ठेवा, पुराव्याशिवाय मी बोलत नाही. तुम्ही पत्ते खेळत होतात हे मी पुराव्यासकट प्रुफ केलं होतं आणि उद्या देखील पुराव्यासकट प्रुफ करेल, असे ते म्हणाले होते.
Manikrao Kokate drags Rohit Pawar to court, accused of playing rummy in the legislature
महत्वाच्या बातम्या
- Dhananjay Munde : मुंडे म्हणाले तसं, बंजारा आणि वंजारी एकच आहेत का?
- Jan Arogya Yojana : जनआरोग्य योजनेत आता २,३९९ आजारांवर उपचार, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत निर्णय
- Nana Patole : महाराष्ट्र कर्जबाजारी, सरकारने श्वेतपत्रिका काढण्याची नाना पटाेले यांची मागणी
- एनकाउन्टरच्या भीतीने बंडू आंदेकरचा मुलगा कृष्णा पाेलीसांना शरण!