विशेष प्रतिनिधी
जालना : मुंबई माेर्चासाठी पाच हजारहून अधिक पाण्याचे टँकर, हजाराहून अधिक अँब्यूलन्स अशी तयारी करा. काेणीही नाेकरी, शेती, व्यवसायाचे कारण सांगू नका. सगळ्यांनी मुंबईवर तुटून पडा. फक्त तीन दिवस मला साथ द्या, असे आवाहन मराठा आंदाेलक मनाेज जरांगे यांनी मराठा समाजाला केले आहे.
अंतरवाली सराटी येथे माध्यमांशी बोलताना जरांगे म्हणाले, कुठलेही कारण न सांगता, शेतकरी, चालक, वाहक, वारकरी आदी सर्वांनी या मोर्चात सहभागी व्हावे. असतील त्यांनी पाण्याचे टँकर आणि रुग्णवाहिका सोबत घ्या. किमान ५००० पाण्याचे टँकर आणि १००० रुग्णवाहिका सोबत असाव्यात. शेतकरी असेल, व्यवसायिक असेल, ड्रायव्हर कंडक्टर असेल, महाराज मंडळी असतील, वारकरी असतील, टाळकरी, गायक, वादक, या सर्वांनी यावेळी तुटून पडावे. सगळे जण मुंबईकडे निघा आता, कुणी शेतीचे कारण सांगू नका, कुणी नोकरीचे कारण सांगू नका. सर्वांनी तयारीने चलायचे आहे.
जरांगे म्हणाले, जे डॉक्टर बांधव ही पत्रकार परिषद ऐकत आहेत त्यांनाही विनंती आहे की, त्यांनीही अँब्यूलन्स आणि औषधी सोबत घ्यावी. तुम्ही म्हणाल, ५००० हजार टँकर सांगितले आणि येथे एकही नाही. माझ्याकडे काय कंपनी आहे का? जिल्ह्या जिल्यातील आपल्या बांधवांना हे घडवून आणावे लागणार आहे.
शिक्षक , वकील डॉक्टरल आणि श्रीमंत राजकारणी मराठे यांनी आपापली वाहने बाहेर काढावीत. तुम्हाला नोकरीवर जायचे तर जा, पण आपली वाहने बाहेर काढा. तुम्ही आम्हाला केवळ तीन दिवस साथ द्या. २७,२८ आणि २९ तारखेला आम्ही मैदानावर बसलो की तुम्ही परत या हवं तर. तुम्ही थांबू नका, असे आवाहन जरांगे यांनी केले.
मराठा समाजाला खरे बोलायला हवे, आम्हाल खोटं होलून कुणालाही मुंबईत न्यायचे नाही. सर्वांनी मुंबईकडे चलायचे आहे. सर्व महाराष्ट्रातील मराठ्यांना विनंती करतो. आपण संपूर्ण शक्तीनीशी यात उतरल्याशिवाय पर्याय नाही. फक्त एकच सांगतो की मला आंदोलन शांततेत हवे आहे. कुणीही जाळपोळ, दगडफेक करायची नाही, असेही जरांगे यांनी स्पष्टपणे सांगितले.
Manoj Jarange demand from the Maratha community for Mumbai march
महत्वाच्या बातम्या
- राहुल गांधींची चोरी पकडल्याचा राग, काँग्रेसकडून पत्रकार शिव अरोर यांच्याविरुद्ध एफआयआर
- शक्ती संवाद : महिला सक्षमीकरणाच्या बरोबरच भारतीय संघराज्य व्यवस्थेतला सुसंवाद वाढविण्याचाही सक्षम प्रयोग!!
- Jarange Supporters : जरांगे समर्थक आक्रमक, लक्ष्मण हाकेंना चपलेचा प्रसाद देणाऱ्यास एक लाख रुपयांचे बक्षीस
- … म्हणून शरद पवारांचा उपराष्ट्रपतीपदासाठी राधाकृष्णन यांना पाठिंब्यास नकार