विशेष प्रतिनिधि
मुंबई : मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे व अनेक मराठा बांधव गेले ४ दिवस झाले मुंबई मधील आझाद मैदानावर आंदोलन करत आहेत. मात्र उच्च न्यायालयाने आता जरांगेंना आझाद मैदान रिकामे करण्याची नोटिस बजावली आहे. दरम्यान अनेक मोठ-मोठे नेते हे जरांगेंना पाठिंबा देतांना दिसत आहेत. मात्र आता यामध्ये एका मुस्लिम नेत्याची देखील भर पडली आहे. Manoj Jarange
मनोज जरांगे पाटील यांना आझाद मैदान सोडण्यासाठी उच्च न्यायालयाने नोटिस बजावली आहे. ही नोटिस देतांना एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली. दरम्यान मनोज जरांगेंवर पोलिसांनी बळजबरी केली तर मुस्लिम समाज छातीचा कोट करून सर्वात पुढे असेल, असं म्हणत इम्तियाज जलील यांनी मनोज जरांगे यांना खंबीर पाठिंबा दर्शविला आहे.
इम्तियाज जलील काय म्हणाले?
सुरवातीपासून म्हणजे अगदी पहिल्या दिवसापासून, जरांगे पाटील यांनी आंदोलन सुरू केलं त्या दिवसापासून माझ्या पक्षाचे अध्यक्ष बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी यांनी लोकसभेत हा मुद्दा उचलला होता. मनोज जरांगेंची आरक्षणाची मागणी सरकारने पूर्ण करावी अशी भूमिका मांडली होती, असे इम्तियाज जलील यांनी म्हणले आहे. केवळ इतकंच नाही तर मी जरांगे पाटील यांचा फॅन आहे. मी त्यांच्यासोबत आहे व कायम राहील असही एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील म्हणाले. Manoj Jarange
सरकारला खरंच काही करायचं आहे का? हा प्रश्न आहे. जेव्हा सरकारला काही करायच नसतं तेव्हा या समित्या गठित केल्या जातात. आता सारकारने काहीतरी ठोस पाऊल उचलण अपेक्षित आहे. आमची अपेक्षा अशी होती की न्यायालयाने सरकारला नोटिस पाठवावी. की या लोकांच्या मागण्या नक्की काय आहेत? मागच्या वर्षभरापासून ही लोकं रस्त्यावर उतरत आहेत मग त्यांना न्याय का मिळत नाहीये? हे हाय कोर्टाने सांगायला पाहिजे अशी आमची अपेक्षा होती, असं मत जलील यांनी व्यक्त केलं.
मराठा आमदारांनी राजीनामा द्यावा!
रस्त्यावर उतरलेले सगळे लोकं हे ग्रामीण भागातून आलेले आहेत. हे रस्त्यावर बसणार, त्रास सहन करणार आणि यांचे नेते एसीमध्ये बसणार, झोपा काढणार. माझी जरांगे पाटलांच्या सर्व समर्थकांना विनंती आहे की मराठा समाजाच्या सगळ्या आमदार खासदारांना उचलून आणा आणि जरांगेंच्या चरणाशी तुमचे राजीनामे द्या. याने एक संदेश पाठवा की आम्हाला समाजाशी देणंघेणं आहे बाकी खुर्चीशी आमच काही देणंघेणं नाही. किमान ज्यांची लढाई इथे सुरू आहे त्यांनी तरी सुरुवात करावी असं आवाहन इम्तियाज जलील यांनी केलं आहे. Manoj Jarange
Manoj Jarange got the support of this Muslim leader
महत्वाच्या बातम्या
- Rahul Gandhi मतचोरीच्या ‘अणुबॉम्ब ‘नंतर आता ‘हायड्रोजन बॉम्ब’ टाकू , राहुल गांधी यांचा इशारा
- Chhagan Bhujbal जरांगे यांच्या विरोधात छगन भुजबळ आक्रमक, ओबीसीतून मराठा आरक्षण विरोधासाठी मुंबईवर धडक
- ओबीसी कोट्यातून आरक्षणास ‘एसईबीसी’चा अडथळा, मराठा समाजाची दोन्ही आरक्षणे जाण्याची भीती
- Politicians during Ganesh Festival : गणपती बाप्पाच्या दर्शनात राजकारण्यांची मांदियाळी!