विशेष प्रतिनिधी
धाराशिव : Manoj Jarange मराठा आरक्षणाच्या मुद्यावर लढणारे मनोज जरांगे आता शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून मैदानात उतरणार आहेत. सरकारला ‘सळो की पळो’ करून सोडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर इथून पुढे इथून मागे 100 वर्षांत झाले नाही असे आंदोलन उभे करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.Manoj Jarange
मनोज जरांगे धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यांनी कळंब तालुक्यातील डिकसळ येथे पत्रकारांशी संवाद साधून आपल्या शेतकरी आंदोलनाची पुढील दिशा स्पष्ट केली. ते म्हणाले, दिवाळी झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी एक राज्यव्यापी बैठक घेतली जाईल. त्या बैठकीत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला जाईल. या प्रकरणी आपल्याला सरकारच्या मुंडक्यावर पाय देऊन मागण्या मान्य करून घ्याव्या लागतील. केवळ वावरात फिरल्याने किंवा भाषणबाजी केल्याने शेतकऱ्यांचा उध्वस्त झालेला संसार उभा राहणार नाही. या प्रकरणी इथून पुढे व इथून मागे 100 वर्षांत कुणी आंदोलन केले असेल असे आंदोलन उभे करावे लागेल. केवळ वावरात फिरल्याने किंवा भाषणबाजी केल्याने शेतकऱ्यांचा उध्वस्त झालेला संसार उभा राहणार नाही.Manoj Jarange
मनोज जरांगे यांनी यावेळी मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्यासाठी 15 दिवसांची वाढीव मुदतही दिली आहे. शेतकरी देशाचा एक महत्त्वाचा घटक आहे. आम्ही सर्वजण शेतकऱ्यांची मुले आहोत. त्यामुळे अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतीचे पंचनाम े करण्यासाठी सरकारला 15 दिवसांची मुदत देण्यात येत आहे. पण कुणबी प्रमाणपत्र वितरित झाल्याशिवाय सरकारने कोणतीही नोकर भरती करू नये, असे ते म्हणाले.
Manoj Jarange to Now Take the Field Over Farmers’ Issues
महत्वाच्या बातम्या
- Vijay Vadettiwar : काॅंग्रेसवर टीका करणाऱ्या जरांगे पाटील यांचा बोलवता धनी कोण? विजय वडेट्टीवार यांचा सवाल
- Devendra Fadnavis : शेतकऱ्याला पुन्हा उभे करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून माेठ्या पॅकेजची घाेषणा
- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे पुणेकरांसाठी नव्या संधींचे द्वार , मुरलीधर मोहोळ यांचे प्रतिपादन
- बनावट पासपोर्ट प्रकरणी नीलेश घायवळसह काढून देण्यासाठी मदत करणाऱ्या दोघांविरुद्धही गुन्हा