विशेष प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर: Manoj Jarange कितीही ताकद लावीन पण आरक्षण दिल्याशिवाय माघार घेणार नाही. आता लढून आरक्षण मिळवायचं आहे. एकाही विद्यार्थ्याने आत्महत्या करू नये. एका टक्क्याहून हुकलात तरी पुन्हा लढून जिंकू पण आत्महत्या कुणीही करू नका, असे आवाहन मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केले.Manoj Jarange
पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले, माझी मराठा समाजाला विनंती आहे, आता माझी तब्येत बरी आहे. आता मी सुट्टी घेत आहे. मराठा समाजाच्या एकाही विद्यार्थ्याने आत्महत्या करू नये. एका टक्क्याहून हुकलात तरी पुन्हा लढून जिंकू पण आत्महत्या कुणीही करू नकासगळ्यांना आरक्षण दिल्याशिवाय मी एक इंचही मागे हटणार नाही
जरांगे म्हणाले, आंदोलनात असणाऱ्या आणि नसणाऱ्यांसाठी लढतोय. प्रामाणिकपणे समाजासाठी लढतोय. त्यामुळे कुणीही आत्महत्या करू नका. आतापर्यंत कायदेशीर लढाई केली. पावणे दोन वर्ष लढलो, सरकारला जर हे जमत नसेल तर रस्त्यावर उतरून लढू
22 फेब्रुवारी ते 22 मार्चपर्यंत गाठी भेटी नियोजन करणार, राज्यातील प्रत्येक गावातील अडचण आम्हाला समजायला हवी. 22मार्चपर्यंत आम्हाला भेटण्यासाठी या, असे आवाहन करत जरांगे म्हणाले,
आता अनेक गावे जोडणार आहे. या महिन्यात गरीब लोक थेट छत्रपती भवनाला जोडणार आहे. आम्हाला लोकांना जोडायचं आहे. एक महिन्याच्या कालावधीत कधीही आम्हाला भेटण्यासाठी या. तुमच्या अडचणी सोडवू, आम्ही लोकांच्या कामात हातभार लावू. गरीबानेच या चळवळीत उभे राहावे. 22 फेब्रुवारीपासून छत्रपती भवन, पैठणफाटा शहागड येथे येऊन आपली समस्या सोडून घ्यावी. आता लोकांना जोडणं महत्वाचं आहे.सलग एक महिना लोकांना जोडण्याचं काम करणार, खान्देश, विदर्भ, कोकण सगळ्या लोकांनी आमच्याकडे यावी, कुणबी मराठा एकच आहे. कुणीही भेदभाव ठेऊ नये. स्वतःहून आमच्याकडे या, कनेक्टिव्हिटी मोहिमेत सहभागी व्हा.
देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना ते म्हणाले,
फडणवीस यांच्यात काल बापाची माया दिसून आली. मुलीची परीक्षा झाल्यावर ते वर्षा बंगल्यावर राहायला जाणार आहेत. लेकीच्या शब्दाच्या पलीकडे तुम्ही जात नाहीत, ती मोठी व्हावी ही आमची शुभेच्छा. पण तुमच्या लेकीत तुम्ही आमच्या मुलांना का बघत नाही? मग तुम्हाला का आमच्या पोराची माया येत नाही.
फडणवीसांची नियत चांगली नाही, अशी टीका करताना ते म्हणाले, तुमची जशी तुमच्या लेकीसाठी तळतळ आहे, तशी तळतळ आमच्या लेकरांसाठी असू द्या. आमचं ईडब्ल्यूएस आरक्षण तुम्ही घालवलं आणि खापर आमच्यावर फोडता. आमच्या काल 4 आत्महत्या झाल्या. कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत तुम्ही आमच्या मागण्यांबाबत कोणताही निर्णय घेतला नाही.? हा भेदभाव कशामुळे.? फडणवीस स्वतःच्या मुलीची परीक्षा असल्याने 500 मीटरवर राहायला जात नाही. मग मराठ्यांच्या मुलांबाबत ही माया का नाही? कधी देणार आम्हाला आरक्षण? आता मराठ्यांनी डोळे उघडावे. 500 मीटर राहायला गेलं तर काय बिघडत.? पण शिक्षणाला फडणवीस महत्व देतात. स्वतःच लेकरु मोठं करायचं हा फडणवीस यांचा संदेश आहे. मराठ्यांनी यातून बोध घ्यावा. आणि स्वतःचे मुडदे पडून घ्यावे. स्वतःच्या मुलांबाबत वेगळी वागणूक आणि दुसऱ्यांच्या मुलांबाबत वेगळी भूमिका… हे असं होतं असेल तर वेगळं आंदोलन करावं लागणार
लवकरच मी मुंबईत शिवाजीपार्क, आझाद मैदानाची पाहणी करायला जाणार, लवकरच मैदान कधी पाहायला जाणार ही तारीख जाहीर करणार आहे.
मराठ्यांशी गद्दारी कराल तर फळ भोगायला तयार राहा, असा इशारा जरांगे यांनी दिला.
आता यापुढील लढाई समोरा समोर असेल. लोकशाही मार्गाने सगळं केलं, गोरगरिबांना त्रास देता, आता तुमचे नाटकं बस. आता निषेध बंद. आता नीट रट्टे देणार. यांची माज मस्ती उतरवणार. आधी चूक आम्ही करणार नाही. मुंबई आंदोलनाची तारीख जाहीर करू. आता आम्ही तिथून उठणार नाही, आता कायम मुंबईत बसणार. मैदान पाहणी करायला कधी जाणार याची आम्ही तारीख जाहीर करू. मुंबईत जाऊन उपोषण करणार नाही. आमची शक्ती दाखवून देऊ. आंदोलनाच स्वरूप आम्ही सांगणार नाही, असेही ते म्हणाले.
Manoj Jarange warns that there will be no retreat unless reservation is given.
महत्वाच्या बातम्या
- अंजली दमानिया यांच्यावर धनंजय मुंडे दाखल करणार फौजदारी अब्रुनुकसानीचा खटला
- पंतप्रधान नरेंद्र मोदी कुंभमेळ्यात, दिल्लीत आज मतदान
- Anjali Damania : अंजली दमानिया यांनी वाचला धनंजय मुंडेंच्या भ्रष्टाचाराचा पाढा, कृषीमंत्री असताना दुपटीहून दराने खरेदी
- Supriya Sule : पीकविमा योजनेतील भ्रष्टाचार प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई, खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रश्नावर केंद्रीय कृषिमंत्र्यांचे आश्वासन