विशेष प्रतिनिधी
मुंबई : आमच्या आंदोलनाची परवानगी आत्ताच्या आत्ता वाढवून द्या. त्यासाठी आम्हाला सहकार्य करा. तुम्ही जर अडथळे आणले तर पुन्हा मराठा समाज मुंबईकडे निघेल. मी जागा सोडणार नाही. सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी झाल्याशिवाय मी इथून उठणार नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्याच्या आंतरवाली सराटीहून निघालेले मनोज जरांगे अखेर आज मुंबईत पोहोचलेत. ते मुंबईत पोहोचण्यापूर्वीच त्यांचे हजारो समर्थक मुंबई व आझाद मैदानावर पोहोचले होते. यावेळी बाेलताना जरांगे म्हणाले, मुख्यमंत्र्यांना एकच विनंती आहे की आज कोट्यावधी लोक मुंबईत आणली आहेत. आम्हाला माज मस्ती नाहीय आमच्या सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी करा आणि गोरगरीब मराठ्यांचा सामना करा. हे मराठे मरेपर्यंत तुम्हाला विसरणार नाहीत.
सरकार आपल्याला सहकार्य करणार नव्हतं म्हणून घराघरातून मराठ्यांनी मुंबईला जायचं आणि मुंबई जाम करायचे ठरवलं होतं. आता आपल्याला सरकारने सहकार्य केलं आहे. त्याबद्दल आपण सरकारचे कौतुक केले. त्यामुळे आता तुम्हालाही सहकार्य करायचे आहे. पुढील दोन तासांत मुंबई मोकळी करा. कोणीही जाळपोळ, दगडफेक करायची नाही.
मराठ्यांची मान खाली जाईल असं एकही पाऊल कुणी उचलायचं नाही. डोक्यावर गुलाल पडल्याशिवाय इथून उठायचं नाही. आपण समाजाला न्याय देण्यासाठी इथे आलो आहोत. आपण शिकलो नाही, आपण लोकांच्या बुद्धीने चाललो. त्यामुळे सत्तर वर्षे वाटोळे झालं हे मराठ्यांनी विसरू नका, असे आवाहन जरांगे यांनी केले.
पोलिसांनी मनोज जरांगे यांना आज सायंकाळी 6 वाजेपर्यंत आझाद मैदानावर आंदोलन करण्याची परवानगी दिली आहे. यासाठी त्यांनी त्यांना 5 हजार आंदोलक सोबत ठेवण्याचेही निर्देश दिलेत. त्यावर तोडगा म्हणून जरांगे यांनी आळीपाळीने आंदोलकांना आझाद मैदानावर येण्याची सूचना केली आहे.
Manoj Jarange warns the government
महत्वाच्या बातम्या
- किती माजलाय तो जरांग्या, भाषा मग्रुरीची : गुणरत्न सदावर्ते यांचा हल्लाबाेल
- मंत्र्याला काढण्याची घटनेतच तरतूद तर घटना दुरुस्ती कशासाठी, प्रकाश आंबेडकर यांचा सवाल
- न्यायदेवता अन्याय करणार नाही, मुंबईत जाणारच : मनाेज जरांगेंचा निर्धार
- एकेरी भाषा, आयाबहिणींवर अपशब्द खपवून घेणार नाही, चंद्रशेखर बावनकुळे यांचा मनाेज जरांगेंना इशारा