Manoj Jarange : मनोज जरांगे यांचे चलो दिल्ली, देशभरातील मराठा समाजाचे राजधानीत अधिवेशन

Manoj Jarange : मनोज जरांगे यांचे चलो दिल्ली, देशभरातील मराठा समाजाचे राजधानीत अधिवेशन

Manoj Jarange

विशेष प्रतिनिधी

जालना : Manoj Jarange  मनोज जरांगे यांनी चलो दिल्लीचा नारा दिला असून, मराठ्यांचे वादळ दिल्लीत धडकणार आहे. देशभरातील मराठा समाजाचे दिल्लीत अधिवेशन घेणार आहेत. लवकरच या अधिवेशनाची तारीख जाहीर करण्यात येणार आहे. Manoj Jarange

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई येथील आझाद मैदानावर उपोषण केले होते. त्यानंतर राज्य सरकारने मनोज जरांगेंच्या 8 मागण्यांपैकी 6 मागण्या मान्य करत हैदराबाद गॅझेटनुसार कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी जीआर काढला. हा मराठा समाजासाठी मोठा विजय मानला जात आहे. तसेच राज्यात लवकरच सातारा गॅझेट देखील लागू होण्याची शक्यता आहे. Manoj Jarange

हैदराबाद गॅझेट, सातारा गॅझेटच्या अंमलबजावणी नंतर दिल्लीमध्ये मराठा समाजाचे अधिवेशन होणार आहे. धाराशिवमध्ये हैदराबाद गॅझेट लागू करण्यासंदर्भात झालेल्या बैठकीमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी ही घोषणा केली आहे. Manoj Jarange



 

मराठा आरक्षणासाठी मुंबईत मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला मोठे यश आले आहे. लाखो मराठा बांधवांनी या आंदोलनात सहभाग घेतला होता. सरकारने जरांगे पाटील यांच्या काही मागण्या मान्य केल्या असून, उर्वरित मागण्यांसाठी वेळ मागितला आहे. मराठा समाजाची प्रमुख मागणी असलेल्या ‘हैदराबाद गॅझेट’ लागू करण्याचा जीआर सरकारने काढला आहे.

हैदराबाद गॅझेट लागू करण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असतानाच, ओबीसी समाजाने मात्र आक्रमक पवित्रा घेतला आहे. या जीआरला विरोध करत, ओबीसी समाजाला त्यांच्या कोट्यातून आरक्षण नको अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. दुसरीकडे, याच गॅझेटचा आधार घेत बंजारा समाज आणि आदिवासी समाजामध्येही संघर्ष सुरू झाला आहे. बंजारा समाजाची एसटी प्रवर्गात समावेश करण्याची मागणी आहे, ज्यामुळे आरक्षणाच्या मुद्यावरून राज्यात विविध समाजगटांमध्ये तणाव वाढत आहे.

Manoj Jarange’s Chalo Delhi, Maratha community from all over the country to hold convention in the capital

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023