विशेष प्रतिनिधी
जुन्नर : मराठा समाजाच्या मागण्यांची अंमजबजावणी करा..हेच मराठे मरेपर्यंत तुमचे उपकार विसरणार नाही, हा आमचा शब्द आहे, असे आवाहन मराठा आंदाेलक मनाेज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केले आहे. Manoj Jarange
मराठा समाजाला आरक्षणाच्या मागणीसाठी बुधवारी अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने रवाना झालेले मनोज जरांगे पाटील गुरूवारी सकाळी शिवनेरीवर पाेहाेचले. यावेळी पत्रकारांशी बाेलताना म्हणाले, रायगड, शिवनेरी येथून प्रेरणा मिळते. खूप मोठ्या वेदना आहेत हे देवेंद्र फडणवीसांनी समजून घेतलं पाहिजे. मराठा समाजाच्या लेकरांच्या वेदनांना न्याय मिळाला पाहिजे, त्याला मुख्यमंत्र्यांनी साथ दिली पाहिजे.
देवेंद्र फडणवीस कुणाला थांबवणार नाहीत. न्यायालयाने जे सांगितलं त्याप्रमाणे आम्हाला करावं लागलं. न्यायदेवतेनं सांगितलं परवानगी घ्या…त्यानंतर 1 दिवसाची आंदोलनाची परवानगी ही चेष्टा आहे. मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत परवानगी देऊ शकता. जाणूनबुजून तुम्ही एक दिवसाची परवानगी दिली.
मुख्यमंत्र्यांना उद्देशून जरांगे म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अजूनही संधी आहे. या संधीचं सोनं करा. . तुम्ही आमचे वैरी नाहीत. फक्त मराठाविरोधी भूमिका सोडा. मी शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्यावरुन सांगतो…देवेंद्र फडणवीसांकडे योग्य संधी आहे. तुम्ही मराठांच्या मागण्यांची अंमजबजावणी करा…हेच मराठे तुम्हाला मरेपर्यंत तुमचे उपकार विसरणार नाही, हा आमचा शब्द आहे, असं मनोज जरांगे म्हणाले.
Manoj Jarange’s words to the CM Devendra Fadnavis
महत्वाच्या बातम्या
- किती माजलाय तो जरांग्या, भाषा मग्रुरीची : गुणरत्न सदावर्ते यांचा हल्लाबाेल
- मंत्र्याला काढण्याची घटनेतच तरतूद तर घटना दुरुस्ती कशासाठी, प्रकाश आंबेडकर यांचा सवाल
- न्यायदेवता अन्याय करणार नाही, मुंबईत जाणारच : मनाेज जरांगेंचा निर्धार
- एकेरी भाषा, आयाबहिणींवर अपशब्द खपवून घेणार नाही, चंद्रशेखर बावनकुळे यांचा मनाेज जरांगेंना इशारा