विशेष प्रतिनिधी
नागपूर – “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्या पद्धतीने काम केले आहे, त्यामुळे खरी शिवसेना म्हणजे शिंदे गट हे अनेकांना समजले आहे. त्यामुळे अनेक लोक आमच्या संपर्कात आहेत आणि टप्प्याटप्प्याने ते पक्षप्रवेश करतील,” असा दावा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केला.
नागपूर येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, मिशन सांगून राबवले जात नाही. एकनाथ शिंदे यांनी ज्या पद्धतीने काम केले आहे, त्यासाठी मिशनची गरज नाही. बाळासाहेबांचे विचार पुढे नेणारी खरी शिवसेना म्हणजे शिंदे गट आहे, हे अनेकांना उमगले आहे. त्यामुळे अनेक लोक आमच्या संपर्कात असून ते टप्प्याटप्प्याने प्रवेश करणार आहेत. मी 90 दिवसांत ठाकरे गट आणि आघाडीच्या 10-12 माजी आमदारांचा प्रवेश होईल असे भाकीत केले होते आणि त्यावर मी ठाम आहे. उद्धव ठाकरे यांच्या पक्षापेक्षा एकनाथ शिंदे यांचा पक्ष संवेदनशील आणि भावनाप्रधान आहे, हे लोकांना जाणवले आहे.
उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना उदय सामंत म्हणाले ते कधी समोर येणार? याची काही चिन्हे नाहीत. आम्ही 237 आमदारांसह सत्तेत आलो आहोत. लोकसभेत नेहरूंना थेट उत्तर दिल्यानंतर आम्ही विधानसभेत आलो
विजय वडेट्टीवार यांच्या ऑफरवर टोला लगावताना सामंत म्हणाले, विजय वडेट्टीवार हे माझे राजकारणाच्या पलीकडचे चांगले मित्र आहेत, पण त्यांना मार्गदर्शन करणारे लोक चांगले नाहीत. त्यांच्या पक्षात प्रदेशाध्यक्ष पदावर वाद सुरू आहेत, तो आधी सोडवावा. आमच्या पक्षात काय सुरू आहे, हे पाहण्याची त्यांना गरज नाही. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही कोणालाही त्रास होईल अशी कृती करणार नाही. आम्ही बालिश नाही, त्यामुळे बालिश राजकारण करू नये.
एसटी विभाग अध्यक्ष पदावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे गटावर कुरघोडी केल्याचा आरोप होत आहे. यावर सामंत म्हणाले, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक मुख्यमंत्र्यांना भेटले आहेत. त्यांच्या भावना देवेंद्र फडणवीस यांनी ऐकून घेतल्या आहेत.
जितेंद्र आव्हाड यांच्या ट्विटवर टीका करताना सामंत म्हणाले, न्यायालयीन प्रकरण सुरू असताना त्यावर ट्विट करून भाष्य करणे योग्य नाही. शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांवर टीका करणे काही लोकांची फॅशन झाली आहे, त्यामुळे त्यावर मी काही बोलणार नाही.
लाडकी बहीण योजनेतील नियमांमुळे संख्येत घट झाली आहे. अनावधानाने किंवा नजरचुकीने काही महिला अपात्र ठरल्या असतील. मात्र, संपूर्ण योजना बंद होणार नाही,” असे सामंत स्पष्ट केले. शिवभोजन थाळी बंद होईल असे वाटत नाही. उलट त्यामध्ये काही नावीन्यपूर्ण बदल होतील,” असेही सामंत यांनी सांगितले.
“एडवांटेज विदर्भ अंतर्गत 15 कोटी 70 लाख रुपयांचे प्रकल्प विदर्भात आले आहेत. भविष्यात विदर्भात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होणार आहे. ही शाश्वत गुंतवणूक असेल म्हणूनच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे,” असे सामंत यांनी सांगितले.
Many people in contact, phased party entry, Uday Samant’s claim on Operation Tiger
महत्वाच्या बातम्या
- अंजली दमानिया यांच्यावर धनंजय मुंडे दाखल करणार फौजदारी अब्रुनुकसानीचा खटला
- पंतप्रधान नरेंद्र मोदी कुंभमेळ्यात, दिल्लीत आज मतदान
- Anjali Damania : अंजली दमानिया यांनी वाचला धनंजय मुंडेंच्या भ्रष्टाचाराचा पाढा, कृषीमंत्री असताना दुपटीहून दराने खरेदी
- Supriya Sule : पीकविमा योजनेतील भ्रष्टाचार प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई, खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रश्नावर केंद्रीय कृषिमंत्र्यांचे आश्वासन