विशेष प्रतिनिधी
गडचिरोली : माओवाद्यांच्या केंद्रीय समितीचा सदस्य व जहाल नक्षल कमांडर माडवी हिडमा, पत्नी राजे उर्फ राजक्का आणि नक्षलवाद्यांच्या तांत्रिक विभागाचा प्रमुख टेक शंकर ठार झाल्यावर आत्मसमर्पित माओवादी नेता भूपती याने भावनिक आवाहन केले आहे. बंदुकीच्या मार्गाने आजवर खूप काही गमावले, यातून काहीही साध्य होऊ शकले नाही. त्यामुळे आता शस्त्रे सोडा अन् मुख्य प्रवाहात या, असे त्याने म्हटले आहे.
डवी हिडमा, पत्नी राजे उर्फ राजक्का व इतर चार माओवादी १८ नोव्हेंबरला छत्तीसगड- आंध्रप्रदेश सीमेवर चकमकीत ठार झाले. तर काल रात्री टेक शंकर ठार झाला. माओवादी चळवळीला हा सर्वांत मोठा धक्का मानला जात आहे. सुरक्षा दलाच्या या कारवाईनंतर आत्मसमर्पित माओवादी नेता मल्लोजुला वेणुगोपाल उर्फ भूपती उर्फ अभय याने १९ रोजी एक व्हिडिओ संदेश जारी केला आहे. त्यात त्याने नक्षलवादी चळवळीतील तरुणांना शस्त्रे साेडण्याचे आवाहन केले आहे.
शेकडो जवान व निष्पाप नागरिकांच्या हत्येचा मास्टमाईंड व पीपल्स लिबरेशन गुरिला आर्मीचा प्रमुख जहाल नेता माडावी हिडमा याला आंध्रप्रदेशच्या अल्लुरी सीमेवरील सीतारामजू जिल्ह्यातील जंगलात सुरक्षा यंत्रणेनेे कंठस्नान घातले. माओवादविबंदुकीच्या मार्गाने आजवर खूप काही गमावले, यातून काहीही साध्य होऊ शकले नाही. त्यामुळे आता शस्त्रे सोडा अन् मुख्य प्रवाहात यारुध्द लढाईतील ही अत्यंत महत्त्वाची कारवाई मानली जाते. दरम्यान, या पार्श्वभूमीवर सीपीआय (माओवादी) चा माजी प्रवक्ता व सर्वोच्च नेता असलेल्या वेणुगोपाल उर्फ भूपतीने जुन्या साथीदारांना थेट आणि भावनिक आवाहन करत ‘हिंसा सोडा, संविधानाचा मार्ग स्वीकारा’ असे सांगितले आहे.सध्याची परिस्थिती अत्यंत चिंताजनक असल्याचे त्याने स्पष्ट केले. ‘बंदुकीच्या मार्गाने काही साध्य झाले नाही; फक्त जीव गमावले जात आहेत. जग प्रगती करत आहे, देश बदलत आहेे. संविधानातच शक्ती आहे, बंदुकीत नाही, असे त्याने स्पष्ट शब्दांत सांगितले. दीर्घ लढ्याचा अनुभव सांगताना तो म्हणतो, आता लोकांच्या प्रश्नांसाठी घटनात्मक चौकटीतूनच लढा द्यावा लागणार आहे. व्हिडिओच्या शेवटी त्याने इच्छुक माओवादी कार्यकर्त्यांना थेट संपर्क साधण्यासाठी पुन्हा आपला मोबाईल क्रमांक जाहीर करत, मुख्य प्रवाहात यावे, असे खुले आवाहन केले.
१५ ऑक्टोबर रोजी माओवादी नेता भूपतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर गडचिरोली येथे आपल्या ६० सहकाऱ्यांसह माओवादी चळवळीतील प्रवासाला पूर्णविराम देत संविधानाचा मार्ग स्वीकारला होता. महाराष्ट्रात माओवादाविरुध्दच्या लढाईतील हे सर्वांत मोठे आत्मसमर्पण मानले जात आहे. यानंतर छत्तीसगडमध्येही शेकडो माओवाद्यांनी शस्त्र सोडत मुख्य प्रवाहात येणे पसंत केले.
Maoist leader Bhupati makes emotional appeal after Hidma and Tech Shankar are killed, saying armed struggle has cost too much and cadres should return to the mainstream.
महत्वाच्या बातम्या
- District Collector : निवडणूक प्रचारासाठी ध्वनीक्षेपकाच्या वापरावर निर्बंध, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी
- Shiv Sena, : शिवसेना, राष्ट्रवादी आमदार अपात्रतेच्या सुनावणी पुढील वर्षी जानेवारीमध्ये
- कुठे नेऊन ठेवला आमचा महाराष्ट्र, ड्रग प्रकरणातील आरोपींच्या भाजप प्रवेशावरून नाना पटोले यांचा सवाल
- काेरेगाव पार्क जमीन प्रकरणी पार्थ पवारांवर गुन्हा दाखल करा, अंजली दमानिया यांची मागणी



















