विशेष प्रतिनिधी
गडचिरोली: माओवाद्यांकडून येत्या 10 जूनला देशव्यापी बंदची हाक देण्यात आली आहे. माओवाद्यांचा सर्वोच्च नेता बसव राजू मारला गेल्यानंतर केंद्र सरकारच्या निषेधासाठी हा बंद होत आहे. त्यासाठी देशभर ‘स्मारक सभा’ आयोजित करण्याचेही माओवाद्यांचे नियोजन आहे. Maoists
छत्तीसगड- महाराष्ट्र सीमेवर काही दिवसांपूर्वी झालेल्या चकमकीत नक्षलवाद्यांचा सर्वोच्च नेता गंगना उर्फ बसवराजूचा मृत्यू झाला होता. नंबाला केशव राव उर्फ बसव राजू या माओवाद्यांच्या जनरल सेक्रेटरीच्या एन्काऊंटरनंतर माओवादी चांगलेच संतापले आहे. केंद्र सरकारने माओवाद्यांच्या शांतता आणि युद्धबंदीच्या प्रस्तावाकडे दुर्लक्ष करत 21 मे रोजी 27 माओवाद्यांची हत्या केल्याचा आरोप माओवाद्यांच्या केंद्रीय समितीने काढलेल्या पत्रकात करण्यात आला आहे. माओवाद्यांची केंद्रीय कमिटीचा प्रवक्ता अभयने हे पत्रक काढले आहे. जानेवारी 2024 पासून केंद्र सरकारने अशाच पद्धतीने 540 माओवाद्यांना मारल्याचे आरोपही या पत्रकातून करण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या याच धोरणाचा विरोध करण्यासाठीच 10 जूनला देशव्यापी बंदचे आवाहन ही माओवाद्यांनी केले आहे. एवढेच नाही तर 11 जून ते 3 ऑगस्ट दरम्यान काम्रेड बसव राजू आणि इतर मारलेल्या माओवाद्यांच्या स्मृतीत ‘स्मारक सभा’ आयोजित करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. Maoists
आत्मसमर्पन धोरण व त्यातून निर्माण होणार संधी हा माओवाद्यांना संघर्षविरामाचा एक मार्ग आहे. त्यामुळे पाकिस्तानचा युद्धबंदीचा प्रस्ताव एका क्षणात मान्य केला व दोन महिन्यापासून आम्ही देत असलेल्या युद्ध बंदीच्या प्रस्तावाकडे मात्र दुर्लक्ष केले जात आहे, हा माओवाद्यांचा दावा महाराष्ट्र नक्षल विरोधी अभियानाचे प्रमुख संदीप पाटील यांनी फेटाळून लावला आहे. माओवाद्यांचा सर्वोच्च नेता नंबाला केशव राव उर्फ बसव राजू मारला गेल्यानंतर माओवाद्यांची आगपाखड झाली असल्याने माओवादी असे दावे करत असल्याचे संदीप पाटील यांनी सांगितले. Maoists
Maoists call for nationwide shutdown on June 10
महत्वाच्या बातम्या
- Kumar Vishwas पाकिस्तानला महिलांची ताकद दाखवून दिली, राष्ट्रीय महिला आयोगाच्या सोहळ्यात कुमार विश्वास यांचे प्रतिपादन
- Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार माळेगावच्या रिंगणात, बिनविरोध निवड होऊ देणार असल्याचा विरोधकांचा इशारा
- Narendra Modi : गोळीला आता गोळ्याने उत्तर मिळेल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा इशारा
- Sanjay Raut : जे भाजपाला ‘चंदा’ देतील त्यांचा धंदा जोरात, संजय राऊत यांची टीका