मराठा आंदोलकांचा शेअर बाजाराच्या इमारतीत शिरण्याचा प्रयत्न, दक्षिण मुंबईतील उद्याेग – व्यवसाय ठप्प

मराठा आंदोलकांचा शेअर बाजाराच्या इमारतीत शिरण्याचा प्रयत्न, दक्षिण मुंबईतील उद्याेग – व्यवसाय ठप्प

Maratha Protesters

विशेष प्रतिनिधी

मुंबई : आझाद मैदानावरील मराठा आंदोलनाचा फटका संपूर्ण दक्षिण मुंबईला बसत आहे. अनियंत्रित रहदारी आणि प्रचंड गर्दीमुळे शहरातील सामान्य व्यवहार ठप्प झाले असून उद्याेग – व्यवसायावर त्याचा परिणाम झाला आहे. साेमवारी सकाळी तर मराठा आंदाेलकांनी शेअर बाजाराच्या इमारतीत घुसण्याचा प्रयत्न केला. Maratha Protesters

मनोज जरांगेंच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या मराठा आंदोलनाचा चाैथा दिवस आहे. मराठा आंदोलकांनी अनेक ठिकाणी रस्ते बंद केले आहेत. आज सकाळी तर मराठा आंदाेलकांनी शेअर बाजाराच्या इमारतीत घुसण्याचा प्रयत्न केला. पण सुरक्षा रक्षकांनी वेळीच हस्तक्षेप करत हेत. त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. या घटनेचे काही व्हिडिओ व्हायरल झालेत.

आम्ही शेअर होल्डर आहोत. आम्हाला शेअर मार्केटचे कार्यालय पाहण्याचा पूर्ण अधिकार आहे. आमचे पैसे गेलेत. आमच्या आंदोलनाचे काहीही परिणाम होऊ शकतात. म्हणून आम्ही मार्केटची स्थिती पाहण्यासाठी आलो आहोत, असे आंदोलक यावेळी म्हणाले. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजार परिसरातील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.



दरम्यान, मनोज जरांगे यांच्या आझाद मैदानावरील आंदोलनाचा संपूर्ण दक्षिण मुंबईला बसला आहे. अनियंत्रित रहदारी आणि प्रचंड गर्दीमुळे शहरातील सामान्य व्यवहार थांबले आहेत. त्याचा फटका दैनंदिन जीवन आणि उद्योग व्यवसायाला बसला आहे. फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष (एफआरटीडब्ल्यूए) यावर संताप व्यक्त करताना म्हणाले की, आठवड्यांच्या शेवटी दुकाने आणि बाजारपेठेतील विक्रीची मोठी घट झाली आहे.

व्यावसायिक बैठका पुढे ढकलल्या जात आहेत. कार्यालयीन कार्यही विस्कळीत झाले आहे. यामुळे व्यावसायिकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. ते पुढे म्हणाले, ही स्थिती लवकरात लवकर संपली पाहिजे. शहरातील स्थिती पूर्वपदावर येण्यासाठी सरकारने चर्चा करावी किंवा हायकोर्टाने त्यात हस्तक्षेप करावा. सध्याची परिस्थिती अशीच कायम राहिली तर दक्षिण मुंबईच्या व्यापार आणि रोजीरोटीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

Maratha Protesters Attempt to Storm Stock Exchange Building, Business Activity in South Mumbai Comes to a Halt

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023