विशेष प्रतिनिधी
मुंबई : मराठा आंदोलक गेले २ दिवस आझाद मैदानात आंदोलन करत आहेत. या मराठा आंदोलकांकडून मुंबईत हुल्लडबाजी करणे, गर्दीच्या ठिकाणी थांबून वाहतुकीचा खोळंबा करणे, असे अनेक प्रकार होत असल्याचे अनेक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत. मात्र महिला पत्रकारांशी असंभैवर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकी झाला आहे
आझाद मैदानात वार्तांकन करण्यासाठी उपस्थित असलेल्या महिला पत्रकारांचा विनयभंग करण्याचा प्रयत्न मराठा आंदोलक करत आहेत, हे टीव्ही जर्नालिस्ट असोसिएशने समोर आणले आहे टिव्ही जर्नलिस्ट असोसिएशनने हे प्रकार थांबवण्यासाठी मनोज जरांगे यांना शेवटचा इशारा दिला आहे. या पत्रात म्हटले की, मराठा आरक्षण मागणीसाठी मुंबईत आंदोलन सुरु आहे. त्याचे वार्ताकन करण्यासाठी मीडिया प्रतिनिधी दिवस रात्र आपल्या सोबत आझाद आझाद आहेत.
मुंबईतील मीडिया प्रतिनिधींना आणि विशेष करून महिला पत्रकारांना तुमच्या कार्यकर्त्यांकडून त्रास देणं सुरु आहे. पत्रकार आणि कॅमेरामन यांनाही कव्हरेज करताना तुमचे कार्यकर्ते धक्काबुक्की, कपडे ओढणे… जबरदस्तीने बूम माईक ओढणे असे प्रकार सुरु आहेत.
महिला पत्रकारांना तुमचे कार्यकर्ते घेरून उभे रहातात. चूकीचे वक्तव्य करून विनयभंग करण्याचा प्रयत्न करत आहेत. तुम्ही स्वतःला शिवरायांचे मावळे समजता ना..? मग महिला पत्रकारांचा अपमान कसा करता..? मुंबईतील मीडिया प्रतिनिधी दिवस-रात्र पावसात तुमचे आंदोलन यांचे वार्तांकन करत आहेत. अशा वेळी गर्दीत तुमचे कार्यकर्ते सर्व पत्रकार आणि कॅमेरामनला त्रास देऊन अतिशय चूकीचे वागत आहेत. आम्ही च्या माध्यमातून तुम्हाला शेवटचा स्पष्ट इशारा देत आहोत…
जर तुमच्या कार्यकर्त्यानी मीडिया प्रतिनिधींना देणं थांबवले नाही तर मुंबईतील सर्व मीडिया तुमच्या आंदोलन वार्ताकनावर बहिष्कार टाकेल. तुमच्या कार्यकर्त्यांनी सहकार्य केले, तरच मुंबई मीडिया तुमचे ठार्ताकन करेल, अशा शब्दांत टीव्ही जर्नालिस्ट असोसिएशनने इशारा दिला आहे.
Maratha protesters misbehave with female journalists; molestation, pushing, trying to pull clothes
महत्वाच्या बातम्या
- शरद पवारांनी आम्हाला ज्ञान शिकवू नये, राधाकृष्ण विखे पाटील यांचा टोला
- शरद पवार भेटीला पोचणार म्हटल्याबरोबर मनोज जरांगे ताठ; उर्मट भाषेत फडणवीसांच्या पाठोपाठ राज ठाकरेंवर निशाणा!!
- मनोज जरांगे प्रमाणिक, पण त्याचा वापर, रोहित पवारांकडून रसद, नितेश राणे यांचा आरोप
- स्वतःचं पोरगं निवडणुकीत पाडलं, कधीपर्यंत भाजपची री ओढणार? मनाेज जरांगे यांचा राज ठाकरेंना सवाल