प्रतापगडावर ‘अफजलखान वध’ शिल्प उभारण्यासाठी बैठक लवकरच, खासदार उदयनराजे भोसले यांचे आश्वासन

प्रतापगडावर ‘अफजलखान वध’ शिल्प उभारण्यासाठी बैठक लवकरच, खासदार उदयनराजे भोसले यांचे आश्वासन

विशेष प्रतिनिधी

सातारा : प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध केला, ही ऐतिहासिक घटना शिवभक्तांच्या भावनांशी जोडलेली आहे. या ठिकाणी ‘अफजलखान वध’ दर्शविणारे शिल्प उभारावे, अशी शिवप्रेमींची मागणी असून, या मागणीचा गांभीर्याने विचार करून तातडीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन प्रतापगड प्राधिकरण समितीचे अध्यक्ष आणि खासदार उदयनराजे भोसले यांनी दिले. Udayanraje Bhosale

प्रतापगड प्राधिकरण समितीची बैठक जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या दालनात पार पडली. या बैठकीला दूरदृश्य प्रणालीद्वारे पालकमंत्री शंभूराज देसाई, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, उपवनसंरक्षक अमोल सातपुते, प्रांताधिकारी योगेश खरमाटे, तहसीलदार सचिन मस्के, पुरातत्त्व विभागाचे संचालक विलास वाहने तसेच अशासकीय समिती सदस्य नितीन शिंदे, मिलिंद एकबोटे, शरद पोंक्षे, सदाशिव टेंटविलकर, सोमनाथ धुमाळ, चंद्रकांत पाटील उपस्थित होते.



बैठकीत राज्य शासनाने दिलेल्या १२७ कोटी रुपयांच्या विकासकामांचा आढावा घेण्यात आला. यामध्ये प्रतापगड किल्ल्याचे संवर्धन, जतन, निविदा मंजुरी, विद्युत सुविधा, प्रशस्त पार्किंग व्यवस्था, आणि आराखड्यातील उर्वरित कामांची पूर्तता या बाबींचा समावेश होता.

प्रतापगड देवस्थानच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर वनराई असल्याने विकासकामांदरम्यान वृक्षतोड झाल्यास पुन्हा वृक्षारोपण करून परिसर हरित ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच आवश्यकतेनुसार प्राधिकरणाच्या मान्यतेने जमिनीचे वर्गीकरण करण्यासही मंजुरी देण्यात आली.

उदयनराजे भोसले यांनी बैठकीदरम्यान सांगितले की, “प्रतापगड हा केवळ किल्ला नाही, तर तो शिवशौर्याचा साक्षीदार आहे. येथे शिवरायांचा पराक्रम भावी पिढ्यांसमोर साकार करण्यासाठी ‘अफजलखान वध’ शिल्प उभारणे अत्यंत गरजेचे आहे.”

Meeting Soon to Discuss Installation of “Afzalkhan Vadh” Sculpture at Pratapgad, Assures MP Udayanraje Bhosale

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023