विशेष प्रतिनिधी
मुंबई : असं कुणाचं सालगडी सारखं काम केलं ना, तर याद राख, हे मेघना बोर्डीकरचे शब्द आहेत. कानाखाली मारीन. पगार कोण देते हा? आताच्या आता बडतर्फ करेल, अशी धमकी देणारा राज्यमंत्री आणि परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांचा एका सार्वजनिक कार्यक्रमातील व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. Meghna Bordikar
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी त्यांच्या एक्स या सोशल मीडिया अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये मेघना बोर्डीकर या कार्यक्रमाच्या मंचावरून एका ग्रामसेवकावर थेट संताप व्यक्त करत असून, अधिकाऱ्याच्या कानाखाली मारण्याची भाषा वापरताना दिसत आहे.
जिंतूर तालुक्यातील बोरी गावात नुकत्याच पार पडलेल्या एका अधिकृत कार्यक्रमात हा प्रसंग घडला. या व्हिडिओत मेघना बोर्डीकर ग्रामसेवकाला उद्देशून म्हणतात, “असं कुणाचं सालगडी सारखं काम केलं ना, तर याद राख, हे मेघना बोर्डीकरचे शब्द आहेत. कानाखाली मारीन. पगार कोण देते हा? आताच्या आता बडतर्फ करेल. चमचेगिरी कोणाची करायचे नाही, याद रख. तू काय कारभार करतो हे मला माहित नाही का? मी मुद्दामून सीईओ मॅडमला इथे घेऊन आले आहे. हमाली करायची ना तर सोडून दे नोकरी”
सभागृहात रम्मी खेळणारे…
पैशांच्या बॅगा भरणारे…
डान्सबार चालवणारे…
आधी वाकडं काम करून नंतर सरळ करणाऱ्यांचा गौरव करणारे..
यामध्ये भर पडली ती आता थेट अधिकाऱ्यांच्या कानाखाली वाजवण्याची धमकी देणाऱ्या मंत्र्याची…सरकारी कार्यक्रमाला घरकुलाच्या लाभार्थ्यांना आणण्याचं टार्गेट… pic.twitter.com/rRMbQsPHde
— Rohit Pawar (@RRPSpeaks) August 2, 2025
हा व्हिडिओ शेअर करताना रोहित पवार यांनी केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की
सभागृहात रम्मी खेळणारे…
पैशांच्या बॅगा भरणारे…
डान्सबार चालवणारे…
आधी वाकडं काम करून नंतर सरळ करणाऱ्यांचा गौरव करणारे..
यामध्ये भर पडली ती आता थेट अधिकाऱ्यांच्या कानाखाली वाजवण्याची धमकी देणाऱ्या मंत्र्याची…
सरकारी कार्यक्रमाला घरकुलाच्या लाभार्थ्यांना आणण्याचं टार्गेट पूर्ण केलं नाही म्हणून भर कार्यक्रमात ग्रामसेवकाला थेट कानाखाली मारण्याची धमकी राज्यमंत्री कोणत्या अधिकारात देऊ शकतात?
देवेंद्र फडणवीस साहेब काय सज्जन मंत्री शोधलेत आपण! तुमच्या मंत्रिमंडळाची तर इज्जत जातेच, पण यापेक्षाही महाराष्ट्राची बेअब्रू होतेय, याची जास्त चिंता आहे.
कृपया यांना आवरा..!
Meghna Bordikar threatens the village servant!
महत्वाच्या बातम्या
- Sadhvi Pragya Singh : भगव्या रंगाला बदनाम करणाऱ्यांना देवच करेल शिक्षा, साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचा संताप
- एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्यासह पाच जणांना न्यायालयान कोठडी, जामीनाचा मार्ग मोकळा
- बांग्लादेशीयांची बोगस प्रमाणपत्रे रद्द करण्यासाठी टास्कफोर्स, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती
- Praniti Shinde : प्रणिती शिंदे यांच्या तमाशा शब्दावर मुख्यमंत्र्यांचा जाेरदार हल्लाबाेल, हा तर भारतीय सैन्याचा अपमान