विशेष प्रतिनिधी
मुंबई : प्रहार संघटनेचे अध्यक्ष माजी आमदार बच्चू कडू यांना सरकारी कामात अडथळा आणि कर्मचाऱ्याला धमकावल्या प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाने सहा महिन्यांची शिक्षा ठोठावली आहे. Bachchu Kadu
2018 च्या प्रकरणात बच्चू कडू दोषी आढळले असून त्यांना दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये 6 महिन्यांची शिक्षा आणि प्रत्येकी 5 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. 2018 साली परीक्षा पोर्टलचा घोटाळा झाला होता. त्यावेळी आयएएस अधिकारी प्रदीप पी यांच्या कार्यालयात बच्चू कडू यांनी राडा केला होता. याप्रकरणी मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला होता आणि आता मुंबईतील अतिरिक्त सत्र न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांनी बच्चू कडू यांना दोषी ठरवले आहे.
तसेच कलम 353 (सरकारी कर्मचाऱ्यावर हल्ला करणे किंवा त्यांचे कर्तव्य बजावण्यापासून रोखण्यासाठी त्यांच्यावर गुन्हेगारी बळाचा वापर करणे) आणि 506 (गुन्हेगारी धमकी) अंतर्गत दोषी ठरवले. दोन वेगवेगळ्या कलमांतर्गत प्रत्येकी 3 महिने शिक्षा आणि प्रत्येकी 5 हजार दंड, अशी एकूण 6 महिने शिक्षा आणि 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. Bachchu Kadu
महत्त्वाचे म्हणजे उच्च न्यायालयात अपील दाखल करेपर्यंत बच्चू कडू यांची शिक्षा स्थगित करण्यात आली आहे. तसेच त्यांना तत्काळ जामीनही मंजूर करण्यात आला. याशिवाय अपमानाच्या आरोपातून बच्चू कडू यांची सुटका करण्यात आली आहे.
बच्चू कडू म्हणाले की, परीक्षा पोर्टलचा घोटाळा झाला होता आणि त्याकाळी केंद्रात सुविधा नव्हत्या. म्हणून विद्यार्थ्यांचे हाल होत होते. परीक्षा प्रक्रियेत प्रचंड भ्रष्टाचार झाला होता. त्यामुळे आयटीच्या संचालकांना याबद्दल पत्र दिले होते. परंतु त्यांनी काहीही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे त्यांना जाब विचारण्यासाठी आम्ही त्यांच्या कार्यलयात गेलो होतो. त्यावेळी लॅपटॉप उचलला म्हणून त्यांनी माझ्याविरोधात तक्रार दाखल केली होती. परंतु व्यवस्था काही बदलत नाही.
शासन निर्णय होऊनही मनपा आयुक्त दिव्यांगांसाठी खर्च करीत नाही. अंमलबजावणी होत नाही म्हणून आम्ही आंदोलन केले होते. मात्र आता मला शिक्षा सुनावण्यात आली आहे. मंत्रालयात देखील मी दोन वेळा तीव्र आंदोलन छेडले होते. लोकांच्या हितासाठी मी आजपर्यंत आंदोलने केले आहे आणि इथून पुढेही करत राहणार, असे बच्चू कडू यांनी स्पष्ट केले.
MLA Bachchu Kadu sentenced to six months in prison for threatening a government employee
महत्वाच्या बातम्या
- Amol Mitkari : आपल्या कार्यकर्तृत्त्वाची महती मंत्रालयात जोरदार रंगलीय, अमाेल मिटकरींचा राधाकृष्ण विखे- पाटील यांना धमकीवजा इशारा
- Allahabad High Court : अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्ताव मंजूर
- मनोज जरांगेंची चावी आणि रिमोट शरद पवार यांच्याच हातात, आमदार परिणय फुके यांचा हल्लाबाेल
- cabinet meeting : राज्यात १५ हजार पोलीस भरतीला मंजुरी, मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय