आई मराठी मेली तरी चालेल, मावशी उत्तर भारत जगायला पाहिजे, आमदार प्रकाश सुर्वे यांचे वादग्रस्त विधान

आई मराठी मेली तरी चालेल, मावशी उत्तर भारत जगायला पाहिजे, आमदार प्रकाश सुर्वे यांचे वादग्रस्त विधान

Prakash Surve

विशेष प्रतिनिधी

मुंबई : मराठी माझी आई आहे, तर उत्तर भारत माझी मावशी आहे. आई मेली तरी चालेल, मात्र मावशी मरायला नाही पाहिजे. असे वादग्रस्त विधान शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी केले आहे. Prakash Surve

मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर मराठी विरुद्ध अमराठी असा वाद पेटलेला असतानाच या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

सुर्वे म्हणाले, मी हे इच्छितो की मराठी माझी आई आह े तर उत्तर भारत माझी मावशी आहे. एकवेळ आई मेली तरी चालेल. पण मावशी मरायला नको. कारण मावशीचे जास्त प्रेम असतं. आई पेक्षा जास्त प्रेम तुम्ही मला दिले आहे. माझ्यासाठी आणि माझ्या सहकाऱ्यांसाठी तुमचे प्रेम असंच ठेवा.

गेल्या काही दिवसांपासून मराठीचा मुद्दा महाराष्ट्रामध्ये चांगला तापला आहे. हिंदी सक्तीचा वरवंटा महाराष्ट्रावर लादण्याचा प्रयत्न झाल्यानंतर ठाकरे बंधूंसह महाराष्ट्रातील मराठीजन रस्त्यावर उतरले होते. त्यामुळे सरकारला एक पाऊल मागे जात हा निर्णय मागे घ्यावा लागला होता.

मनसे नेते नयन कदम यांनी प्रकाश सुर्वे यांचा व्हिडिओ शेअर करत त्यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले, मागाठाणेच्या मराठी माणसाने हा आमदार निवडून दिला आहे का? “मराठी मेली तरी चालेल” स्वतःच्या आईला मारून यूपीची मावशी जगवतो हा, याचा जाहीर निषेध, असे म्हणत नयन कदम यांनी तीव्र निषेध नोंदवला आहे.

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये मराठीचा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. केंद्र सरकारने हिंदी भाषेची सक्ती करण्याचा प्रयत्न केल्यानंतर, ठाकरे बंधूंसह राज्यातील मराठी जनतेने तीव्र विरोध करत रस्त्यावर उतरून आंदोलन केले. या जनरेट्यामुळे अखेरीस सरकारला हा निर्णय मागे घेत जवळपास गुंडाळून टाकावा लागला.

आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीतही मराठी भाषेचा आणि अस्मितेचा मुद्दा चांगलाच तापण्याची चिन्हे आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर, शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी “आई मेली तरी चालेल, मात्र मावशी मरायला नाही पाहिजे” असे जे वादग्रस्त विधान केले आहे, त्यामुळे सद्यस्थितीत शिंदे गटाची राजकीय अडचण वाढण्याची शक्यता आहे.

MLA Prakash Surve in Controversial Remark

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023