विशेष प्रतिनिधी
फलटण (सातारा): Satara Doctor Crime News फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर यांच्या आत्महत्येप्रकरणी राज्यभरात संताप व्यक्त होत असतानाच आता या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार स्वतःच वादात अडकले आहेत. आत्महत्या केलेल्या डॉक्टरचे नाव सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी कायद्याचे उल्लंघन केल्याची गंभीर बाब समोर आली आहे. Satara Doctor Crime News
या महिला डॉक्टरने आत्महत्येपूर्वी हातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये पोलीस निरिक्षक गोपाल बदने यांच्यावर बलात्काराचा आणि पोलिस प्रशांत बनकर यांच्यावर मानसिक छळाचा आरोप केला होता. या घटनेनंतर सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली. परंतु, या संवेदनशील घटनेत पीडितेचे नाव आणि ओळख उघड करणे हे स्वतःत गुन्हा ठरतो, असे कायद्यात स्पष्ट नमूद आहे.
भारतीय कायद्यानुसार, बलात्कार किंवा लैंगिक अत्याचाराशी संबंधित प्रकरणात पीडितेचे नाव, फोटो किंवा ओळख जाहीर करणे हा दंडनीय गुन्हा आहे. Satara Doctor Crime News
यासंदर्भातील प्रमुख कायदे पुढीलप्रमाणे आहेत: भारतीय दंड संहिता (IPC) कलम 228A: कोणत्याही माध्यमातून बलात्कार पीडितेची ओळख उघड केल्यास 2 वर्षांपर्यंत कारावास आणि दंड होऊ शकतो. माहिती तंत्रज्ञान अधिनियम (IT Act) कलम 67: अश्लील अथवा गोपनीय माहिती सोशल मीडियावर प्रकाशित केल्यास गुन्हा नोंदवला जाऊ शकतो. भारतीय पुरावा अधिनियम (Indian Evidence Act) कलम 327(2): बलात्काराशी संबंधित प्रकरणांतील सुनावणी गुप्त ठेवणे बंधनकारक आहे.
या तरतुदीनुसार, रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्टमध्ये मृत डॉक्टरचे नाव नमूद करून कायद्याचे उल्लंघन केले असून, त्यांच्यावर IPC 228A आणि IT Act 67 अंतर्गत गुन्हा नोंदवण्याची मागणी होत आहे.
http://youtube.com/post/Ugkx3DZ1NNiw5y6nenhl-moJoUOPM4ekxW09?si=UordULewOhd7Gy5O
कायदा तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, “संवेदनशील प्रकरणात लोकप्रतिनिधींनी जबाबदारीने वागले पाहिजे. आरोपींवर कारवाईची मागणी करणे योग्य आहे, पण पीडितेचे नाव उघड करून तिच्या सन्मानावर आघात करणे हा गंभीर गुन्हा आहे.”
दरम्यान, महिला संघटनांनीही रोहित पवार यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्याची मागणी केली आहे. त्यांचे म्हणणे आहे की, “जनतेचे प्रतिनिधी असूनही त्यांनी कायद्याचे उल्लंघन केले आहे. पोलिसांनी तत्काळ तपास सुरू करून संबंधित कलमांनुसार कारवाई करावी.”
MLA Rohit Pawar in Trouble Over Phaltan Case; Demand for FIR After He Revealed Rape Victim’s Name on Social Media
महत्वाच्या बातम्या
- भाजपच्या मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात शिंदे – ठाकरे गटाचे नेते साथ साथ, रवींद्र धंगेकर यांना वसंत मोरेंचा पाठिंबा
- व्हिजन डॉक्युमेंट साकारणार विकसित भारताचे स्वप्न : मुख्यमंत्र्यांचा विश्वास
- तर सर्वांची धार्मिक स्थळे अशीच लाटली जातील, जैन बोर्डिंग प्रकरणावरून रवींद्र धंगेकर यांचा इशारा
- औरंगजेबाच्या कबरीजवळ दिवा लावून दाखवा आणि एक लाख रुपये बक्षीस घ्या..



















