विशेष प्रतिनिधी
अलिबाग : पन्नास खोके म्हणून चिडविल्याने महिला नेत्याच्या विरोधात आमदार पत्नीने संताप व्यक्त केला. दोघींची चांगलीच हमारतुमरी झाल्याने कार्यकर्तेही भिडले.
शेकापचे सरचिटणीस आणि माजी आमदार जयंत पाटील यांच्या सुनबाई चित्रलेखा पाटील आणि शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांच्या पत्नी मानसी दळवी यांच्यात हा वाद झाला. पन्नास खोके सरकार करतेय काय ? सत्ता तुमच्याकडे असताना हे सरकार करतंय काय?
आम्हाला तुमच्या सहानुभूतीची अजिबात गरज नाही, अशा स्वरुपात चित्रलेखा पाटील यांनी सत्ताधाऱ्यांवर संताप व्यक्त केला. यावेळी, त्यांच्या पाठीमागे उभ्या असलेल्या आमदार महेंद्र दळवी यांच्या पत्नी चिडल्या आणि त्यांनी थेट चित्रलेखा पाटील यांना पाठीमागून धक्का दिला. त्यानंतर, या दोन्ही महिला नेत्यांमध्ये शाब्दित वाद झाला. त्यानंतर या दोघांच्या कार्यकर्त्यांमध्ये हमरीतुमरी झाली.
एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेतील 40 पेक्षा जास्त आमदारांनी बंड करुन गुवाहटी गाठल्यानंतर त्यांच्यावर गद्दार आणि 50 खोक्के एकदम ओक्के अशी टीका करण्यात येत होती. त्याच अनुषंगाने चित्रलेखा पाटील यांनी कुणाचेही नाव न घेता 50 खोके म्हटले होते.
MLA’s wife furious with female leader for teasing Pannas Khoke, Ekadam Okk
महत्वाच्या बातम्या
- ब्राझीलच्या राष्ट्रपतींचा PM मोदींशी संवाद; म्हणाले होते- मी ट्रम्पशी नाही तर मोदींशी बोलेन
- AI Avatar ब्रिटनचा पहिला ‘व्हर्च्युअल खासदार’: नागरिकांशी संवाद साधण्यासाठी खासदाराचा AI अवतार
- National Herald Case : नॅशनल हेराल्ड केस- राऊस अव्हेन्यू कोर्टात पुन्हा सुनावणी; आरोपपत्रावर कोर्टाने ईडीकडून मागितले स्पष्टीकरण
- Putin : पुतीन या वर्षाच्या अखेरीस भारत दौऱ्यावर येणार; रशियाकडून तेल खरेदीमुळे ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लादला