विशेष प्रतिनिधी
मुंबई : दारू पिऊन सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर राजश्री मोरेच्या गाडीला धडक देऊन तसेच मी तुला विकत घेऊ शकतो, असे म्हणत शिवीगाळ करणारा मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष जावेद शेख यांचा मुलगा राहील शेख याच्यापासून मनसेने अंतर ठेवले आहे.मनसे राहील खानच्या कृत्याचे समर्थन करत नसून, पोलिसांनी त्याच्यावर योग्य ती कारवाई करावी, असे मनसेने काढलेल्या पत्रकात म्हटले आहे.Raheel Khan
राजश्री मोरेने पोस्ट केलेल्या व्हिडिओनुसार, मनसे नेते जावेद शेख यांचा मुलगा राहील शेख हा मद्यधुंद अवस्थेत होता. अपघात झाल्यानंतर शिवीगाळ करत पैसे घे, जा आणि पोलिसांना सांग, मी जावेद शेखचा मुलगा आहे. मग काय होईल ते तुला दिसेल, अशी धमकी राहील शेखने दिली आहे. त्यानंतर, पोलिसांनी त्याला आंबोली पोलिस स्टेशनमध्ये नेले असता, तेथेही त्याने रात्रभर धिंगाणा केल्याची माहिती समोर आली आहे. राजश्री मोरेसोबत अर्धनग्न अवस्थेत आणि दारूच्या नशेत हुज्जत घालतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी राहिल शेखविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
- Eknath Shinde : चर्चेत राहण्यासाठी नाना पटोलेंचा प्रयत्न होता का?; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सवाल
या संपूर्ण प्रकरणाबाबत मनसेचे ठाणे, पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी पत्रक काढले आहे. जावेद शेख हे आमच्या पक्षाचे पदाधिकारी आहेत. त्यांच्या मुलाने जे कृत्य केले आहे, त्याच्याशी आमच्या पक्षाचा काही संबंध नाही. त्या कृत्याचे समर्थन आमचा पक्ष करत नाही. संबंधित पोलिस यंत्रणांनी त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी, ही विनंती, असे परिपत्रकात म्हटले आहे. याप्रकरणी मनसेकडून आपली भूमिका स्पष्ट करण्यात आली असून संबंधित राहिल शेखवर कारवाई करण्याचे स्पष्टपणे सूचवले आहे.
याआधीही राजश्री तिच्या एका व्हिडिओमुळे सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली होती. मनसेने मराठी भाषेच्या वापरावर दिलेल्या जोरदार आग्रहावर तिने नाराजी व्यक्त केली होती. इतरांवर भाषा लादण्यापेक्षा स्थानिकांनी स्वतः अधिक मेहनत करावी, असे ती म्हणाली होती. मुंबईतील स्थलांतरितांमुळेच स्थानिक मराठी लोकांची परिस्थिती अधिक खराब होणार नाही, असा दावा करत तिने वाद निर्माण केला होता. या विधानानंतर वर्सोवा परिसरातील मनसे कार्यकर्त्यांनी तिच्याविरोधात ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर राजश्रीने जाहीर माफी मागितली आणि संबंधित व्हिडीओ तिच्या सोशल मीडिया हँडलवरून हटवला.
MNS clarifies that it does not support Raheel Khan’s actions
महत्वाच्या बातम्या
- Girish Mahajan : तुम्ही राजकीय दलाली केल्यामुळेच उद्धवजींची सेना संपली, गिरीश महाजन यांचा संजय राऊत यांच्यावर पलटवार
- Rupali Chakankar : रुपाली चाकणकर काय रश्मिका मंदाना आहेत? सुषमा अंधारे यांचा सवाल
- Aditi Tatkare : सरकारी महिला कर्मचारी लाडकी बहीण लाभ चार महिन्यांपूर्वीच बंद, आदिती तटकरे यांची माहिती
- Raju Shetti : शेतकऱ्यांची भिकाऱ्याशी तुलना करणाऱ्या माणिकराव कोकाटेंना मंत्रिमंडळात ठेवू नका, राजू शेट्टी यांची मागणी