विशेष प्रतिनिधी
अहिल्यानगर : Radhakrishna Vikhe-Patil : कॉग्रेस नेते राहूल गांधी यांचा सर्वाधिक वेळ परदेशात जात असल्याने, देशातील राजकीय परिस्थिती समजून घ्यायला त्यांना वेळ लागेल. निवडणूक प्रक्रियेच्या विरोधातील त्यांची विधाने म्हणजे मतदारांचा अपमान असल्याची टीका जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.Radhakrishna Vikhe-Patil
कॉग्रेस नेते राहूल गांधी यांनी विविध वृत्तपत्रांत लेख लिहून महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांमध्ये गैरप्रकार झाल्याचा आराेप केला आहे. त्यावर प्रत्युत्तर देताना विखे पाटील म्हणाले, केवळ निवडणूक प्रक्रीयेला बदनाम करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. मागील दोन लोकसभा निवडणुकीत कॉगेस पक्ष जेमतेत चाळीस जागांपर्यत मजल मारू शकला होता. यंदा चाळीसच्या शंभर झाल्या मग ते फिक्सिंग होत का? आंध्र आणि हिमाचल प्रदेश राज्यात तुमच्या पक्षाचे सरकार आले ते सुध्दा फिक्सिंगमुळे आले का या प्रश्नांची उतर सुध्दा राहूल गांधीनी दिली पाहीजेत. निवडणूक प्रक्रीये विरोधात विधान करून राहूल गांधी स्वत:ची बदनामी करून घेत आहेत. लोकसभेची निवडणूक खोटे नॅरेटिव्ह पसरवून केली गेली. काही ठिकाणी त्याचा परीणाम पाहायला मिळाला. विधानसभा निवडणुकीची राजकीय परीस्थीती मात्र वेगळी होती. महायुतीला राज्यातील मतदारांनी कौल दिला. मात्र मतदारांचा सातत्याने अपमान करण्याचे काम राहूल गांधी यांच्याकडून होत आहे. त्यांनी देशात वेळ दिला तर, राजकीय परीस्थीतीची माहीती होईल.
- Devendra Fadnavis : आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी संयमी जीवनशैली आवश्यक, देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन
उध्दव ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत आणि खा.सुप्रिया सुळे यांनी राहूल गांधीच्या वक्तव्याच्या केलेल्या समर्थनाची खिल्ली उडवून विखे पाटील म्हणाले, त्यांच्या वक्तव्याकडे दुर्लक्ष करणे योग्य ठरेल. खा.सुप्रिया सुळे यांना स्वताचे कोणतेच मत राहीलेले नाही. लोकसभेत मांडण्यात आलेल्या विधेयकाला ते कधी पाठींबा देतात, कधी चर्चेच्या वेळी गैरहजर राहाता. त्यांचे पिताश्री मोदीचे कौतुक करतात याकडे लक्ष वेधून त्यांनी खरच एकदा निर्णय घेतला पाहीजे की, आघाडीसोबत राहायचे की मोदींच्या बरोबर काम करायचे. त्यांच्या पक्षातील लोकांचा सुध्दा त्यांच्यावर विश्वास राहीलेला नाही.
Most of the time in abroad it will take them to understand the political situation in the country, Radhakrishna Vikhe-Patil’s insult to Rahul Gandhi
महत्वाच्या बातम्या
- Girish Mahajan : तुम्ही राजकीय दलाली केल्यामुळेच उद्धवजींची सेना संपली, गिरीश महाजन यांचा संजय राऊत यांच्यावर पलटवार
- Rupali Chakankar : रुपाली चाकणकर काय रश्मिका मंदाना आहेत? सुषमा अंधारे यांचा सवाल
- Aditi Tatkare : सरकारी महिला कर्मचारी लाडकी बहीण लाभ चार महिन्यांपूर्वीच बंद, आदिती तटकरे यांची माहिती
- Raju Shetti : शेतकऱ्यांची भिकाऱ्याशी तुलना करणाऱ्या माणिकराव कोकाटेंना मंत्रिमंडळात ठेवू नका, राजू शेट्टी यांची मागणी