विशेष प्रतिनिधी
काेल्हापूर : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारने यावेळी लक्ष घालून सर्वांचे हित जपून मार्ग काढला पाहिजे. मनाेज जरांगेंच्या (Manoj Jarange) मागण्या सरकार पूर्ण करेल, अशी आशा आहे, असे सांगत मनोज जरांगे पाटील यांना आमचा आधीपासूनच पाठिंबा असल्याचे काेल्हापूरचे खासदार शाहू महाराज यांनी स्पष्ट केले.
मराठी समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा आंदाेलक मनाेज जरांगे पाटील (Manoj Jarange) २९ ऑगस्टपासून मुंबईत आंदाेलन सुरू करत आहेत. या पार्श्वभूमीवर खासदार शाहू महाराज म्हणाले सरकारने मनाेज जरांगे यांची भूमिका ऐकून घेतली पाहिजे. गणेशोत्सवासारख्या सणांच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये.
शाहू महाराज म्हणाले की, मराठा आरक्षणाचा विषय अजूनही सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. या प्रकरणी न्यायालय काय निर्णय देते, हे पाहणे महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर सरकार न्यायालयात आपली बाजू कशी मांडते, हाही एक महत्त्वाचा मुद्दा आहे. मराठा आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक निर्णय घेईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली, कारण सरकारकडे मोठे बहुमत आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश गवई यांया प्रकरणी योग्य आणि न्याय्य निर्णय देतील. आरक्षण हा सर्वांसाठी महत्त्वाचा विषय असून, सरकारने यातून मार्ग काढणे आवश्यक आहे.
दरम्यान, मनोज जरांगे यांनी आपण आंदोलनावर ठाम असल्याचे स्पष्ट केले आहे. आतापर्यंत खूप चर्चा झाली. आरक्षण नाही तर आंदोलनही मागे नाही. बुधवारी मी मुंबईच्या दिशेने निघेल. आंदोलनाची तारीख बदलणार नाही. आता आमचे आंदोलन निर्णायक टप्प्यावर आहे. त्यामुळे मराठ्यांनी साथ द्यावी. मी मुंबईला जाणार आहे. तुम्हीही मुंबईला पोहोचा. मुख्यमंत्र्यांनी आपल्या ओएसडींना पाठवले आहे. मी त्यांच्याशी चर्चा केली. पण त्यात फार काही विशेष घडले नाही.
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात 10 टक्के आरक्षण देण्याबाबत राज्य सरकारने दोन दिवसांत निर्णय घ्यावा, अन्यथा सरकार उलथवून टाकू, असा अल्टिमेटमही मनोज जरांगे यांनी दिला.मराठा समाजाला आरक्षण आर्थिकदृष्ट्या मागासांच्या 10 टक्के कोट्यातून नाही, तर ओबीसी कोट्यातून आले पाहिजे. सरकारने आरक्षण दिले नाही तर मी सरकारही उलथवून लावीन. आंतरवाली सराटी सोडल्यानंतर मी कोणाचेही ऐकणार नाही, असे ते म्हणाले.
MP Shahu Maharaj supports Manoj Jarange
महत्वाच्या बातम्या
- NDA बिहार निवडणुकीसाठी एनडीएची जागावाटप चर्चा अंतिम टप्प्यात
- Uddhav Thackeray : गणराया, अपशकुनी मांजरांचा बंदोबस्त कर, उद्धव ठाकरे यांचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल
- Manoj Jarange : प्रत्येकाने मुंबईला यावे, आता ही शेवटची लढाई, मनोज जरांगे यांचे मराठा समाजाला आवाहन
- Ajit Pawar “मग योजना बंद करू का?” बोगस लाभार्थी प्रकरणावर अजित पवारांचा सवाल