विशेष प्रतिनिधी
बीड : Dhananjay Munde फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्येवर माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काॅंग्रेस अजित पवार गटाचे आमदार धनंजय मुंडे यांनी खळबळजनक दावा केला आहे. हातावर लिहिलेले अक्षर या डाॅक्टरचे नसल्याचे तिच्या बहिणीने सांगितले आहे. त्यामुळे ही आत्महत्या की हत्या असा सवालही मुंडे यांनी केला आहे.Dhananjay Munde
महिला डॉक्टरने पीएसआय गोपाळ बदने याने चारवेळा बलात्कार केल्याचे आणि घरमालकाचा मुलगा प्रशांत बनकर याने त्रास दिल्याचे हातावर लिहून ठेवले होते. हा मजकूर आत्महत्येपूर्वीची चिठ्ठी म्हणून गृहीत धरला जात असताना ते अक्षर या महिला डॉक्टरचे नसल्याचा दावा धनंजय मुंडे यांनी केला आहे. धनंजय मुंडे यांनी रविवारी महिला डॉक्टरच्या बीडमधील घरी जाऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले होते. यावेळी त्यांनी या महिला डॉक्टरच्या हातावरील लिहिलेला मजकूर हा तिच्या अक्षरातला नसल्याचे आपल्याला तिच्या बहिणीने सांगितल्याचे मुंडे म्हणाले. यामुळे ही आत्महत्या आहे की हत्या याचा तपास व्हायला हवा. संबंधित पोलीस अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करत त्यांचे सीडीआर तपासण्याची मागणी धनंजय मुंडे यांनी केली आहे.Dhananjay Munde
डॉक्टर महिलेला तिच्या विशिष्ट जातीमुळे हिणवण्यात येत होते. खासदारांच्या दोन पीएंचा देखील या प्रकरणात संबंध जोडला गेला आहे, असे मुंडे म्हणाले.
.फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्येच्या प्रकरणात न्यायालयाने आरोपी पीएसआय गोपाल बदने याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आत्महत्येपूर्वी महिला डॉक्टरने आपल्या हातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये बदनेने आपल्यावर चारवेळा बलात्कार केला होता असे लिहिले होते. सोबतच प्रशांत बनकर याने देखील शारीरिक आणि मानसिक अत्याचार केल्याचे म्हटले होते.
Murder or suicide; Dhananjay Munde’s sensational claim on female doctor’s suicide
महत्वाच्या बातम्या
- महिला डॉक्टरची आत्महत्या नसून संस्थात्मक हत्या, राहुल गांधी यांचा आरोप
- धंगेकर अन्यायविरोधात लढणारा कार्यकर्ता, पण आपल्याला महायुतीत दंगा नको, एकनाथ शिंदे यांची भूमिका
- मुरलीधर मोहोळांनी विशाल गोखलेंसाठी केला पदाचा गैरवापर, १९७ कोटींचा हवाई घोटाळ्याचा रवींद्र धंगेकरांचा आरोप
- पुण्यात जमिनीचा मोठा धिंगाणा, मुरलीधर मोहोळ यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेण्याची विजय वडेट्टीवार यांची मागणी



















