माझे घर-माझे अधिकार’, सर्वांसाठी घर उपलब्ध करून देण्यासाठी 70 हजार कोटींची गुंतवणूक , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

माझे घर-माझे अधिकार’, सर्वांसाठी घर उपलब्ध करून देण्यासाठी 70 हजार कोटींची गुंतवणूक , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

Devendra Fadnavis

विशेष प्रतिनिधी

मुंबई : राज्यात ‘माझे घर-माझे अधिकार’ या अंतर्गत नवे गृहनिर्माण धोरण राबवले जाणार आहे. सर्वांसाठी घर उपलब्ध व्हावे, हाच याचा उद्देश आहे. यासाठी 70 हजार कोटींची गुंतवणूक केली जाणार असून झोपडपट्टी पुनर्वसन ते पुनर्विकास असा सर्वांगीण कार्यक्रम राबवला जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. त्यात सरकारने राज्याच्या नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर केले. या निर्णयांतर्गत सरकार सुमारे 70 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.

ष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आज राजभवनात आयोजित एका छोटेखानी सोहळ्यात कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. मंत्रालयातील मंत्रिमंडळ सभागृहात झालेल्या या बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.

त्याचबरोबर मंत्रिमंडळाने धुळे जिल्ह्यातील सुलवाडे जामफळ कनोली उपसा सिंचन योजनेच्या 5329.46 कोटी रुपयांच्या सुधारित खर्चासही मान्यता दिली आहे. या प्रकल्पामुळे 52,720 हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे.



मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय:

  • कारंजा, जिल्हा वाशिम येथे दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर स्थापन करण्याचा निर्णय. यासाठी एकूण 28 पदनिर्मितीला तसेच 1.76 कोटींच्या खर्चाला मंजुरी (विधी व न्याय विभाग)
  • बायोमिथेनेशन तंत्रज्ञानाचा वापर करुन कॉम्प्रेस्ड बायोगॅस प्रकल्पाची उभारणी करण्यासाठी मे. महानगर गॅस लिमिटेड यांना बृहन्मुंबई महापालिकेच्या अखत्यारीतील देवनार येथील भूखंड सवलतीच्या दरात भाडेपट्ट्याने उपलब्ध करुन देणार (नगरविकास विभाग)
  • उद्योग विभागाच्या अंतर्गत धोरण कालावधी संपुष्टात आलेल्या धोरणांतर्गत विभागाकडे प्रलंबित असलेल्या प्रस्तावांना मंजुरी (उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग)
  • सुलवाडे जामफळ कनोली उपसा सिंचन योजना, तालुका शिंदखेडा, जिल्हा धुळे या प्रकल्पाच्या 5329.46 कोटी रुपयांच्या सुधारित खर्चास मान्यता. 52,720 हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार (जलसंपदा विभाग)
  • अरुणा मध्यम प्रकल्पांतर्गत मौजे हेत, तालुका वैभववाडी जिल्हा सिंधुदुर्ग या प्रकल्पासाठी 2025.64 कोटी रुपयांच्या सुधारित खर्चास मान्यता. 5310 हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार (जलसंपदा विभाग)
  • पोशिर प्रकल्प, तालुका कर्जत जिल्हा रायगड या प्रकल्पाला 6394.13 कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता. (जलसंपदा विभाग)
  • शिलार तालुका कर्जत जिल्हा रायगड या प्रकल्पाला 4869.72 कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता. (जलसंपदा विभाग)

My House-My Rights’, investment of Rs 70 thousand crores to provide housing for all, information from Chief Minister Devendra Fadnavis

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023