NCW : महिला आयोगाकडून उल्लू अ‍ॅपची कानउघाडणी; अश्लीलतता पसरविल्या प्रकरणी सीईओ आणि अभिनेता एजाज खानला समन्स

NCW : महिला आयोगाकडून उल्लू अ‍ॅपची कानउघाडणी; अश्लीलतता पसरविल्या प्रकरणी सीईओ आणि अभिनेता एजाज खानला समन्स

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : अश्लीलतता पसरविणारी उल्लू अ‍ॅपवरील ‘हाऊस अरेस्ट’ या वेब शोमधील एक व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. राष्ट्रीय महिला आयोगाने स्वतःहून (suo motu) या प्रकरणाची दखल घेतली असून उल्लू अ‍ॅपची कानउघाडणी केली आहे. अश्लीलतता पसरविल्या प्रकरणी सीईओ आणि अभिनेता एजाज खानला समन्स बजावले आहे.

या व्हिडीओमध्ये शोचा सूत्रसंचालक आणि बिग बॉसचा माजी स्पर्धक एजाज खान महिलांसोबत जबरदस्तीने खासगी, लैंगिक कृती व पोझिशन्स दाखवण्यास भाग पाडत असल्याचे दिसत आहे. महिलांनी स्पष्टपणे नकार दिला असतानाही त्यांना अश्लील कृती करायला सांगण्यात आले, असा गंभीर आरोप आहे.

महिला आयोगाच्या मते, हा प्रकार केवळ महिला सन्मानाला तडा देणारा नाही, तर लैंगिक जबरदस्तीला ‘मनोरंजना’च्या नावाखाली प्रोत्साहन देणारा अत्यंत घातक प्रकार आहे. यात संमतीचे तत्व पूर्णतः धाब्यावर बसवले गेले आहे. बालके आणि किशोरवयीन प्रेक्षकांसाठीही हे अत्यंत अयोग्य आहे.



या प्रकारामुळे भारतीय न्याय संहिता २०२३ (BNS) आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० अंतर्गत गंभीर गुन्हे दाखल होऊ शकतात, असे आयोगाने स्पष्ट केले आहे. यामुळे महिला आयोगाने उल्लू अ‍ॅपचे सीईओ विभू अग्रवाल आणि शोचा सूत्रसंचालक एजाज खान यांना ९ मे २०२५ रोजी हजर राहण्याचे समन्स बजावले आहेत.

आयोगाच्या अध्यक्षा विजय राहाटकर यांनी सांगितले की, “कोणतेही माध्यम किंवा डिजिटल प्लॅटफॉर्म असे महिलांना वस्तूप्रमाणे दाखवते, त्यांच्यावर जबरदस्ती करते किंवा नैतिक सीमारेषा ओलांडते, ते सहन केले जाणार नाही. अशा प्रकारांवर कठोर कारवाई करण्यातयेईल.”

यापूर्वीही आयोगाने युट्युबर रणवीर अल्लाबादिया यांच्या वादग्रस्त कंटेंटबाबत कारवाई केली होती. माध्यमांना महिलांच्या सन्मानाबाबत जबाबदारीने वागावे, असे बजावले होते.

महिला आयोगाने सर्व ओटीटी प्लॅटफॉर्मना आवाहन केले आहे की, ‘मनोरंजना’च्या नावाखाली महिलांचा अपमान, लैंगिक शोषण किंवा अश्लीलतेला प्रोत्साहन देणारा कोणताही कंटेंट प्रसारित करू नये. कायदा, नैतिकता आणि स्त्रीसन्मान यांचा आदर राखला पाहिजे. महिला आयोग यापुढेही सजग राहून, अशा प्रकारांवर कठोर कारवाई करत राहील, असेही आयोगाने स्पष्ट केले आहे.

National Commission for Women slams Ullu app; summons CEO and actor Ajaz Khan for spreading obscenity

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023