विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या नेतृत्वाखाली राज्यात नैसर्गिक शेती मिशन सुरू केले जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. नैसर्गिक शेती मिशनमुळे शेतकर्यांचा उत्पादन खर्च कमी होईल. तसेच उत्पादकता वाढून जमिनीची क्षमता आणि कस वाढेल. त्यामुळे शेती फायद्याची होईल, असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला.Devendra Fadnavis
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार शुक्रवारी राजभवन येथे राज्यातील मंत्री, आमदार आणि खासदारांसाठी ‘नैसर्गिक शेती’ विषयावरील चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमानंतर प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “वातावरण बदलाचा शेतीवर परिणाम होत असून उत्पादकता कमी होत आहे तर उत्पादन खर्च वाढतो आहे. या सर्व गोष्टींवर उपाय म्हणजे नैसर्गिक शेती आहे. त्यामुळे राज्यपालांच्या नेतृत्वाखाली राज्यात प्राकृतिक शेती मिशन सुरू करत आहोत.” Devendra Fadnavis
राज्यात यंदा कापूस आणि सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले आहे. शेतकर्यांनी कष्टाने पिकवलेला कापूस आणि सोयाबीन खरेदीसाठी राज्य सरकार राज्यभर खरेदी केंद्र सुरू करणार आहे, अशी माहितीही फडणवीस यांनी यावेळी दिली. शेतकर्यांनी या खरेदी केंद्रावरच आपला माल विकावा. खासगी व्यापारी त्यांचा माल हमीभावाने विकत घेत असेल तरच तो खासगी व्यापार्यांना विकावा, असे आवाहनही त्यांनी राज्यातील शेतकर्यांना केले.
कापूस आणि सोयाबीन खरेदीसाठी येत्या 30 तारखेपासून नोंदणी प्रक्रिया सुरू होणार आहे. शेतकर्यांना विनंती आहे, कुणीही हमीभावापेक्षा कमी भावात माल विकू नये. आपण सगळ्यांची नोंदणी करणार आहोत आणि सगळा शेतमाल खरेदी करणार आहोत. त्यासाठी नाफेड, केंद्र सरकार आणि राज्याच्या पणन विभागाने राज्यभरात खरेदीचे मोठे जाळे निर्माण केले आहे. सीसीआयसोबतही आपण याबाबत करार केला आहे. शेतकर्यांनी सरकारकडे नोंदणी करावी आणि सरकारी केंद्रांवर माल विकावा, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
Natural Farming Mission in the state, announced by Chief Minister Devendra Fadnavis
महत्वाच्या बातम्या
- भाजपच्या मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात शिंदे – ठाकरे गटाचे नेते साथ साथ, रवींद्र धंगेकर यांना वसंत मोरेंचा पाठिंबा
- व्हिजन डॉक्युमेंट साकारणार विकसित भारताचे स्वप्न : मुख्यमंत्र्यांचा विश्वास
- तर सर्वांची धार्मिक स्थळे अशीच लाटली जातील, जैन बोर्डिंग प्रकरणावरून रवींद्र धंगेकर यांचा इशारा
- औरंगजेबाच्या कबरीजवळ दिवा लावून दाखवा आणि एक लाख रुपये बक्षीस घ्या..



















