विशेष प्रतिनिधी
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने आपली उमेदवारी यादी जाहीर केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती मतदारसंघातून लाडणार की नाही संभ्रम दूर झाला आहे. बारामतीत अजित पवार यांच्यासह सर्व मंत्री आणि सुनील टिंगरे यांचा अपवाद वगळता सर्व विद्यमान आमदारांना उमेदवारी जाहीर झाली आहे. वडगाव शेरी येथून नाव जाहीर करण्यात आले नसल्याने ते गॅसवर आहेत.
अजित पवार गटाचे उमेदवार पुढीलप्रमाणे :
बारामती – श्री. अजित पवार, येवला – श्री. छगन भुजबळ, आंबेगाव – श्री. दिलीप वळसे-पाटील
कागल – श्री. हसन मुश्रीफ, परळी – श्री. धनंजय मुंडे
दिंडोरी -श्री. नरहरी झिरवाळ, अहेरी – श्री. धर्मरावबाबा आत्राम, श्रीवर्धन – आदिती तटकरे
अंमळनेर – श्री. अनिल भाईदास पाटील, उदगीर – श्री. संजय बनसोडे, अर्जुनी मोरगाव -श्री. राजकुमार बडोले, माजलगाव -श्री. प्रकाश दादा सोळंके, वाई – श्री. मकरंद पाटील, सिन्नर – श्री. माणिकराव कोकाटे, खेड आळंदी – श्री. दिलीप मोहिते, श्री. संग्राम जगताप, इंदापूर – श्री. दत्तात्रय भरणे, अहमदपूर – श्री. बाबासाहेब पाटील, शहापूर – श्री. दौलत दरोडा, पिंपरी – श्री. अण्णा बनसोडे, कळवण – श्री. नितीन पवार
कोपरगाव – श्री. आशुतोष काळे, अकोले – डॉ. किरण लहामटे, बसमत – श्री. चंद्रकांत उर्फ राजू नवघरे, चिपळूण – श्री. शेखर निकम, मावळ – श्री. सुनील शेळके, जुन्नर – श्री. अतुल बेनके मोहोळ -श्री. यशवंत विठ्ठल माने, हडपसर -श्री. चेतन तुपे, देवळाली -श्रीमती. सरोज आहिरे, चंदगड – श्री. राजेश पाटील, इगतपुरी -श्री. हिरामण खोसकर, तुमसर -श्री. राजू कारेमोरे, पुसद – श्री. इंद्रनील नाईक, अमरावती शहर – सौ. सुलभा खोडके, नवापुर – श्री. भरत गावित
पाथरी – श्रीमती निर्मला उत्तमराव विटेकर, मुंब्रा-कळवा – श्री. नजीब मुल्ला