विशेष प्रतिनिधी
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या ( शरदचंद्र पवार ) प्रदेशाध्यक्षपदावरून जयंत पाटील अखेर पायउतार झाले आहेत. प्रदेशाध्यक्षपदी शशिकांत शिंदे यांनी निवड झाली आहे. मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत एक बैठक पार पडली. या बैठकीत शशिकांत शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे.
जयंत पाटील यांनी राजीनामा दिल्याचे वृत्त शनिवारीच प्रसूत झाले होते. यावरून पवार गटाच्या सुप्रिया सुळे आदी नेत्यांनी माध्यमांवरच आगपाखड केली होती. मात्र हे वृत्त खरे होते हे सिद्ध झाले आहे. जयंत पाटील यांनी पक्षाच्या वर्धापदिनीच राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र प्रदेशाध्यक्षपद सोडू नये, अशी पक्षातील अनेकांची इच्छा होती.
महाराष्ट्रात पालिका आणि जिल्हा परिषद अशा स्थानिय स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बदल होणार असल्याचे संकेत दिले जात होते. आज अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी पश्चिम महाराष्ट्रातील नेते शशिकांत शिंदे यांच्या खांद्यावर सोपवली आहे. राष्ट्रवादीच्या दुसऱ्या फळीतील नेते असलेल्या शशिकांत शिंदे यांना पश्चिम महाराष्ट्रासह राज्यभरात पक्षांची वाढ करण्याची जबाबदारी असणार असून त्यांची परीक्षा स्थानिय स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांत होणार आहे.
शशिकांत शिंदे यांचा जन्म १९ ऑक्टोबर १९६३ रोजी झाला असून ते जावळी तालुक्यातील हुमगावचे रहीवासी आहे. त्यांना माथाडी कामगार चळवळीतील प्रभावशाली नेते म्हटले जाते. कॉमर्समध्ये ग्रॅज्युएट असलेले शशिकांत शिंदे हे तरुण वयापासूनच सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. सातारा लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार उदयनराजे भोसले यांना त्यांनी कडवी झुंज दिली होती.
NCP state president, responsibility falls to Shashikant Shinde
महत्वाच्या बातम्या
- Sanjay Shirsat : संजय शिरसाट यांच्या अडचणी संपेनात! सामाजिक न्याय खात्यात 1500 कोटींच्या टेंडर घोटाळ्याचा आरोप
- jayant patil : राजीनाम्यावर मौन सोडताना जयंत पाटील यांचे भाजप प्रवेशावर भाष्य
- Kaustubh Dhavase : मुख्यमंत्र्यांच्या गुंतवणूक व धोरण मुख्य सल्लागारपदी कौस्तुभ धवसे यांची नियुक्ती
- Shiv Sena dispute : शिवसेनेतील वादावर तीन महिन्यात निकाल, पक्ष आणि धनुष्य बाण चिन्हाचा होणार फैसला