विशेष प्रतिनिधी
नाशिक : TCS Harassment टीसीएसमधील महिला कर्मचाऱ्याच्या लैंगिक छळ, जबरदस्ती धर्मांतर आणि धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी नाशिक पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (SIT) 1,500 पानी दोषारोपपत्र नाशिक रोड सत्र न्यायालयात दाखल केले आहे. या प्रकरणात चार आरोपींविरोधात गंभीर कलमे लावण्यात आली असून, तपासात राष्ट्रीय महिला आयोगाच्या हस्तक्षेपाची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याची माहिती समोर आली आहे.TCS Harassment
या प्रकरणात भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत गुन्हेगारी कट, बलात्कार, अधिकाराच्या पदाचा गैरवापर करून लैंगिक संबंध, लग्नाचे खोटे आश्वासन देऊन शारीरिक संबंध, लैंगिक छळ, धार्मिक भावना दुखावणे, पुरावे नष्ट करणे, आरोपींना आश्रय देणे आणि सामूहिक हेतू यांसारखी गंभीर कलमे लागू करण्यात आली आहेत. तसेच अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गतही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.TCS Harassment
दरम्यान, या प्रकरणातील सप्लीमेंट्री चार्जशीट दाखल होण्यात राष्ट्रीय महिला आयोगाचा सिंहाचा वाटा असल्याचे समोर आले आहे. आयोगाच्या फॅक्ट फाइंडिंग समितीने तपासादरम्यान काही नवीन गंभीर कलमे समाविष्ट करण्याची शिफारस नाशिक पोलिसांना आणि मुख्यमंत्री कार्यालयालाही केली होती.
सूत्रांच्या माहितीनुसार, मुख्य पीडितेने सुरुवातीला पोलिसांना संपूर्ण माहिती देण्यास टाळाटाळ केली होती. मात्र राष्ट्रीय महिला आयोगाच्या समितीने तिला समजावून सांगून विश्वास दिल्यानंतरच तिने सविस्तर जबाब नोंदवण्यास तयारी दर्शवली. आयोगाच्या समितीने जिल्हा न्यायाधीशांशी संपर्क साधून पीडितेचा विशेष जबाब सीआरपीसी कलम 164 अंतर्गत अतिरिक्त जिल्हा न्यायाधीशांसमोर नोंदवून घेतला. या जबाबात अत्यंत धक्कादायक माहिती समोर आल्याचे सूत्रांनी सांगितले.
तसेच तपासातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे मुख्य पीडितेने आपला मोबाईल फोन फॉरेन्सिक तपासासाठी पोलिसांकडे सुपूर्त केला. यापूर्वी तिने मोबाईल देण्यास नकार दिला होता. मात्र राष्ट्रीय महिला आयोगाने विश्वास दिल्यानंतरच तिने मोबाईल तपास यंत्रणेकडे दिल्याचे समजते.
नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सांगितले की, “हे प्रकरण अत्यंत गंभीर स्वरूपाचे होते. महिलांचे कार्यस्थळी लैंगिक शोषण आणि त्यांच्या जातीय ओळखीच्या आधारावर लक्ष्य केल्याचे आरोप असल्याने सखोल तपासासाठी SIT स्थापन करण्यात आली. मात्र या प्रकरणात टीसीएस कंपनीला जबाबदार धरण्यात आलेले नाही.”
SIT प्रमुख सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी सांगितले की, 17 साक्षीदारांचे जबाब न्यायालयासमोर नोंदवण्यात आले असून, वैद्यकीय अहवाल, जबरदस्ती धर्मांतराचे पुरावे, जप्त कागदपत्रे, बँक व्यवहार, वाहन आणि ओळख परेड यांचा समावेश दोषारोपपत्रात करण्यात आला आहे.
दरम्यान, या प्रकरणातील आरोपींचे जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळले असून सर्व आरोपी अद्याप न्यायालयीन कोठडीत आहेत.
NCW’s Intervention Key in TCS Harassment Case as Nashik SIT Files 1,500-Page Chargesheet
महत्वाच्या बातम्या
- High Court : जनावरांच्या कत्तल निर्बंधांवर स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाचा नकार
- Rohit Pawar : “भाजपसोबत जाणार नाही”; रोहित पवारांच्या विधानाने राष्ट्रवादीत नव्या चर्चांना उधाण
- ‘नीट’चा पेपर कसा फोडला, ते ही पुरावा न सोडता; चौकशीसाठी पोलिसांनी गाठलं मांढरेंचं कॉलेज! तपासात काय सापडलं पाहा!
- शेतकऱ्यांना कर्जवाटप वाढवा, सीबीलमुळे कुणालाही रोखू नका; मुख्यमंत्री फडणवीसांचे बँकांना निर्देश