विशेष प्रतिनिधी
गडचिरोली : Vijay Wadettiwar पालकमंत्री पदावरून महायुतीत नाराजी नाट्य सुरु झाले आहे. मंत्री गिरीष महाजन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटायला त्यांच्या दरे गावी गेले आहेत. यावरून काँग्रेचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी महायुतीतील नाराजीवर टोला लगावला आहे. शिंदेंना संपवून उद्या नवीन उदय पुढे येईल, असे त्यांनी म्हटले आहे.Vijay Wadettiwar
पत्रकारांशी बोलताना शिंदे यांच्या नाराजीवर ते म्हणाले, नाराजी दाखवून काही पदरात मिळेल हा प्रयत्न सुरू आह. शिंदे यांची परिस्थिती आजच्या राजकारणात बिकट आहे. शिंदे यांची गरज संपली का? . उद्धव ठाकरेंना संपवून शिंदेंना आणलं. आता शिंदेंना संपवून नवीन ‘उदय’ पुढे येईल. तो उदय कुठला असेल, शिवसेनेच्या बाबतीत त्याला पुढे आणण्याचा प्रयत्न होईल.
मला बदनाम करा पण बीड जिल्ह्याला बदनाम करु नका, धनंजय मुंडे यांची विनंती
उदय सामंत का? हे सांगताना ते म्हणाले, उद्याचा शिवसेनेचा नवा उदय तुम्हाला दिसेल. ही शक्यता नाकारता येत नाही. कारण उदय दोन्ही डगरीवर हात मारून आहेत. संबंध चांगले करून ठेवले आहे. ते उद्याच्या उदयासाठीच आहेत
पालकमंत्री वादावर वडेट्टीवार म्हणाले, ही सगळी परिस्थिती पाहून जनताच सरकारला स्थगिती देईल असं वाटायला लागलं आहे. काय सावळा गोंधळ सुरु आहे, काय ड्रामा सुरु आहे. एवढं बहुमत असताना आपसात मतभेद वाढले. सत्तेसाठी, पैसे मिळवण्यासाठी ही स्पर्धा सुरू आहे. महाराष्ट्राने शरमेने मान खाली घालावी अशी स्पर्धा सुरू आहे
“भांडा सौख्यभरे असे म्हणण्याची वेळ आली आहे” आज पालकमंत्री बदलले. उद्या मंत्री बदलायची पाळी येईल. परवा उपमुख्यमंत्री बदलायची वेळ येईल. त्यानंतर मुख्यमंत्री बदलायची वेळ येईल आणि महाराष्ट्राचं वाटोळं होईल.
पंकजा मुंडे यांनी बीडचे पालक मंत्री पद मिळाले नाही म्हणून नाराजी व्यक्त केली आहे. यावर ते म्हणाले, आता दुःख करून काही मिळणार नाही. एक-एक ओबीसीचे मत घेऊ सत्तेवर आले. ओबीसीच्या नेत्यांना मात्र पद्धतशीरपणे एकएकाला नेतृत्वहीन करायचे प्रयत्न भारतीय जनता पक्षाकडे सुरू आहे.
पहाटेच्या शपथविधीला आपला विरोध होता. मात्र अजित पवारांनी निर्णय घेतला. त्याची शिक्षा आपल्याला मिळत आहे असे वक्तव्य मंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे. यावर वडेट्टीवार म्हणाले, अंगावर आल्यावर सगळे आठवते, त्यावेळेस का नाही आठवलं? पुढाकार कोणी घेतला? जाऊ नका काय सांगताय.पण पुढे तुम्हीच गेले. दादांसोबत जाणारा पहिला माणूस हा धनंजय मुंडे स्वतः होता
भाजप ज्या पद्धतीने शिंदेच्या बरोबर ‘मधुर ‘ संबंध ठेवत आहे ते लक्षात घेता पुढे स्वतंत्र लढण्याची त्यांची तयारी आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेतून याची सुरुवात करत आहेत पहिले एकाला (शिंदे) आणि नंतर (पवार) बाजूला करून भाजपला एकहाती सत्ता आणायची आहे .
New ‘ Uday ‘ will come after ending Shinde, Vijay Wadettiwar on the displeasure in the Mahayuti
महत्वाच्या बातम्या
- Dhananjay Munde मला बदनाम करा पण बीड जिल्ह्याला बदनाम करु नका, धनंजय मुंडे यांची विनंती
- Dhananjay Munde धनंजय मुंडे आता तरी राजीनामा द्या, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचे आवाहन
- Saif Ali Khan सैफ अली खान हल्ला प्रकरणात मुख्य आरोपी बांगलादेशी नागरिक असल्याचे उघड
- Ashwini Vaishnav भारतातील डिजिटल क्रांतीचा दावोस येथे जयघोष