Nitesh Rane : महाराजांना जाणता राजा बोलू नका हे कोण म्हणाले होते? नितेश राणे यांनी केली रोहित पवार यांची बोलती बंद

Nitesh Rane : महाराजांना जाणता राजा बोलू नका हे कोण म्हणाले होते? नितेश राणे यांनी केली रोहित पवार यांची बोलती बंद

Nitesh Rane

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Nitesh Rane महाराजांना जाणता राजा बोलू नका हे कोण म्हणाले होते? हे आपल्या आजोबांना जाऊन विचारा असा सवाल करत मत्स्य व बंदर मंत्री नितेश राणे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची बोलती बंद केली.Nitesh Rane

बुधवारी विधानसभेमध्ये राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा करण्यात अली. या चर्चेत सहभागी होताना रोहित पवार म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणारा कोरटकर एवढा मोठा कधी झाला? सरकार त्याच्या घराला सुरक्षा देते आणि त्या सुरक्षेतून तो मध्य प्रदेशात पळून जातो. मध्य प्रदेशात भाजपचे सरकार आहे, इथेही भाजप आणि मित्रपक्षांचे सरकार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मध्य प्रदेशाच्या मुख्यमंत्र्यांना फोन करून त्या कोरटकरला का पकडत नाही?



“राहुल सोलापूरकरवरही सरकारने कारवाई केली नाही. याउलट पुणे महापालिकेत पदावर घेऊन बक्षीस दिले. सीबीआय, ईडीने मोतेवार यांच्या जप्त केलेल्या गाड्या कोरटकर वापरतो. यावर आता सीबीआयने कारवाई केली. दिल्लीमध्ये बसून सीबीआय कारवाई करते. पण, आपले सरकार कारवाई करत नाही,” अशा शब्दात आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर टीका केली.

आमदार रोहित पवार यांनी केलेल्या टीकेवर प्रत्युत्तर देताना मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी जोरदार हल्लाबोल केला. “सदर प्रकरणी राज्य सरकारकडून कोरटकर आणि सोलापूरकर या दोघांवरही कारवाई सुरू आहे. आमदार रोहित पवार हे सभागृहात चुकीची माहिती देत आहेत. औरंग्या होता म्हणून शिवाजी महाराज झाले असे जितेंद्र आव्हाड बोलतात. हे आम्हाला शिकवणार? छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांना आमचे सरकार सोडणार नाही.

यावेळी आमदार रोहित पवार आणि मंत्री नितेश राणे यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झाली. सत्ताधाऱ्यांकडून गोंधळ घालून कोरटकरच्या मुद्द्यापासून पळ काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण, आम्हाला या विषयापासून दूर जायचे नाही. कोरटकर, सोलापूरकर वर कारवाई झालीच पाहिजे,” मी तुमच्या घरापर्यंत जात नाही. त्यामुळे माझ्या आजोबांबद्दल काय बोलत आहात? अशा शब्दात निलेश राणे यांना रोहित पवार यांनी ठणकावले.

Nitesh Rane stopped talking to Rohit Pawar

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023