विशेष प्रतिनिधी
पुणे : Ajit Pawar तुम्ही किती उलट सुलट प्रश्न विचारा. तुम्ही काही केलं तरी आम्ही एकत्र राहण्याचे ठरवले आहे. खऱ्या बातम्या द्यायला सुरुवात करा, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांनाच खडसावले.Ajit Pawar
जुन्नरचे अपक्ष आमदार शरद सोनवणे यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. यावेळी पुणे जिल्हा भगवा करू असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. यावर पत्रकारांनी विचारले असता अजित पवार यांनी त्यांनाच सुनावले. पवार म्हणाले, खऱ्या बातम्या द्यायला सुरुवात करा. तुम्ही काही केलं तरी आम्ही एकत्र राहण्याच ठरवल आहे. उद्या मी कुठल्या जिल्ह्यात गेलो तरी हा राष्ट्रवादीचा जिल्हा करू असं म्हणेल. प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. ते शिवसेनेचे नेते आहेत. पुणे जिल्हा भगवा करायचा आहे, असे म्हणणाच. ते महाराष्ट्रात गेल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात तसं सांगू शकतात. देवेंद्र फडणवीस प्रत्येक जिल्ह्यात गेले तर ते सांगू शकतात मी गेलो तर मी सांगू शकतो. तुम्ही किती उलट सुलट प्रश्न विचारा आम्ही एकत्र राहण्याचा निर्णय घेतला आहे. जनतेच्या हातात आहे कुणाच्या हातात सूत्र द्यायची, कोणाच्या हातात सूत्र द्यायची नाही.
शिवसेना ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांनी स्वारगेट बसस्थानक कार्यालयाच्या केलेल्या तोडफोडीवर ते म्हणाले, पूर्ण तपास होऊन सत्यता पुढे येऊ द्या.एखादा आरोपी सापडत नाही म्हणून तोडफोड करत असाल तर स्वतःला वेगळं दाखवण्याचा प्रयत्न कराल. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान कोणी करत असेल तर तो पक्ष किंवा त्या कार्यकर्त्यांकडून वसूल केले पाहिजे, असं कोर्टाने सांगितलं आहे.राग व्यक्त करण्याच्या काही गोष्टी असू शकतात. काही अतिउत्साही कार्यकर्त्यांचा उत्साह पाहायला मिळतोय. त्यांच्यावरही कायद्याच्या चौकटीत राहून कारवाई केली जाईल.
अर्थसंकल्पावर बोलताना अजित पवार म्हणाले, उद्याच्या तीन तारखेला पुरवणी मागण्या मांडल्या जाणार आहेत.आम्ही अर्थसंकल्प सादर करणार आहोत. सर्व घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न केंद्र सरकारने केला आहे.तसाच निर्णय आम्ही घेऊ.
पीएमपीएल मध्ये डेपो मॅनेजर महिलांना व ड्रायव्हर लोकांना त्रास देतो याबाबत मी टीव्ही वरती पाहिलं आहे. जो कोणी दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई केली जाईल. मी पीएमपीएलच्या आयुक्तांशी बोललेलो आहे, त्यांना सूचना दिलेल्या आहेत, असे पवार यांनी सांगितले.
तानाजी सावंत यांचे टेंडर रद्द केलं आहे त्याबाबत मी माध्यमात वाचलं आहे. मी पूर्ण माहिती घेऊन या प्रकरणात लक्ष घालेल. या गोष्टीची शहानिशा करेल, असे ते म्हणाले.
No matter how many counter-intuitive questions we together, Ajit Pawar fell on the media
महत्वाच्या बातम्या
- Devendra Fadnavis गतिमान आणि प्रगतीशील कायदा-सुव्यवस्था उभी करणार! अमित शहा यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस यांची बैठक
- Russia : ”रशियाने युक्रेनमधील चेर्नोबिल पॉवर प्लांटवर हल्ला केला”
- PM Modi : पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यामुळे भारत-अमेरिका व्यापार संबंध अधिक मजबूत
- Manipur : मणिपूरमधील कॅम्पमध्ये सीआरपीएफ जवानाने केला गोळीबार अन् नंतर…