विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुख्यमंत्री झाल्यानंतर राज ठाकरेंचा मला अभिनंदनाचा फोन आला होता. त्यावेळेस मी त्यांना सांगितले होते घरी येईन. त्यांना भेटून गप्पा मारल्या, नाश्ता केला. आमच्या या भेटीचा किंवा बैठकीचा कुठलाही राजकीय संदर्भ नाही.
केवळ मैत्रीकरता मी त्यांच्या घरी गेलो होतो, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
फडणवीस यांनी राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यामुळे राजकीय चर्चा सुरु झाली आहे. वेवेगळे अर्थ लावले जात आहेत. यावर या भेटीचा कोणताही राजकीय अर्थ काढू नये असे फडणवीस यांनी सांगितले.
विधानसभा निवडणुकीतील मतदानात घोळ झाल्याचा आरोप मनसे अध्यक्ष ठाकरेंनी केला होता. महायुतीच्या विजयावर त्यांच्याच लोकांचा विश्वास बसला नव्हता अशी टीकाही त्यांनी केली होती, या दोन प्रमुख नेत्यांची सुमारे तासभर बंद दाराआड चर्चा सुरू होती. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. पण त्यावर मनसे किंवा भाजप, यापैकी कोणत्याच पक्षाच्या नेत्यांनी मौन सोडले नाही. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच या भेटीचं गुपित विचारण्यात आलं असता, त्यांनी थेट उत्तर दिले.
No political context in Raj Thakrey visit Devendra Fadnavis clarified
महत्वाच्या बातम्या
- अंजली दमानिया यांच्यावर धनंजय मुंडे दाखल करणार फौजदारी अब्रुनुकसानीचा खटला
- पंतप्रधान नरेंद्र मोदी कुंभमेळ्यात, दिल्लीत आज मतदान
- Anjali Damania : अंजली दमानिया यांनी वाचला धनंजय मुंडेंच्या भ्रष्टाचाराचा पाढा, कृषीमंत्री असताना दुपटीहून दराने खरेदी
- Supriya Sule : पीकविमा योजनेतील भ्रष्टाचार प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई, खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रश्नावर केंद्रीय कृषिमंत्र्यांचे आश्वासन