विशेष प्रतिनिधी
नांदेड : Ajitdada and Ashok Chavan राज्याच्या राजकारणात शरद पवार यांच्यावर घरे फोडल्याचा आरोप केला जातो. काकाच्या विरोधात पुतण्याला लढविले. शरद पवारांचा हाच वारसा अजित पवार पुढे चालवत आहेत का अशी चर्चा सुरू झाली आहे. याचे कारण महायुतीतील नेते असलेल्या अशोक चव्हाण यांच्या पुतण्याला त्यांनी फोडले आहे.Ajitdada and Ashok Chavan
राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार रविवारी नांदेड दौऱ्यावर आहेत. भारतीय जनता पक्षाचे राज्यसभा सदस्य अशोक चव्हाण यांचे पुतणे प्रा. उदय चव्हाण, शेषेराव चव्हाण यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेला हा पक्षप्रवेश सोहळा महत्त्वाचा मानला जात आहे.
भाजप खासदार अशोक चव्हाण यांना त्यांच्या गृह जिल्ह्यात शह देण्याचा हा प्रयत्न आहे का, अशी चर्चा यामुळे सुरु झाली आहे. प्रा. उदय चव्हाण यांच्यासोबत माजी सभापती स्वप्नील चव्हाण, वैशाली चव्हाण यांच्यासह काँग्रेसचे आणि इतरही पक्ष, संघटनेतील, पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश झाला. हा पक्ष प्रवेश सोहळा नांदेड येथील चव्हाणवाडी येथे झाला. या सोहळ्याला मंत्री इंद्रजीत नाईक, माजी मंत्री संजय बनसोडे, माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर, आमदार प्रताप पाटील चिखलीकर, माजी आमदार मोहना हंबर्डे, माजी आमदार ओम प्रकाश पोकर्ण, माजी आमदार अविनाश घाटे तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अशोक चव्हाण यांचे सख्खे मेहुणे माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर यांनी त्यासाठी पुढाकार घेतला. प्रा.उदय चव्हाण 1980 च्या दशकात पैठणहून नांदेडमध्ये आले. त्यानंतर पुढील बरीच वर्षे खा.अशोक चव्हाण यांच्यासोबत राजकारणात काम केलं. ते 1990 मध्ये भाजपमध्ये गेले. सुरुवातीला काँग्रेस आणि मग 2002 ते 2007 या कालावधीत ते नांदेडमध्ये नगरसेवकही होते. भाजपमध्ये तत्कालीन खासदार डी. बी. पाटील यांचे निकटवर्ती असलेले प्रा.उदय चव्हाण हे पुन्हा खा.अशोक चव्हाण यांच्या जवळ आले. चव्हण यांच्या राजकारणापासून मात्र ते दूर होते. काही वर्षांपूर्वी खा.अशोक चव्हाण यांनी त्यांना धर्माबादच्या लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयात प्राध्यापकपदाची संधी दिली. तेथे सात वर्षे सेवा बजावल्यानंतर अलीकडेच ते निवृत्त झाले. दीड वर्षापूर्वी खा.अशोक चव्हाणांनी भाजपमध्ये प्रवेश केला, तरी प्रा.उदय चव्हाण यांनी त्यांच्या पाठोपाठ प्रवेश करणं टाळलं. निवृत्तीनंतर ते शेती व इतर व्यवसायात कार्यरत आहेत.
Not Sharad Pawar, but Ajitdada broke Ashok Chavan’s nephew, he joined NCP
महत्वाच्या बातम्या
- Harshvardhan Sapkal : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; हर्षवर्धन सपकाळ यांची भूमिका
- Sophia Qureshi : बेजबाबदार पाकिस्तान, भारतावर हल्ला करत असतानाही सुरू ठेवली नागरी विमानसेवा, कर्नल सोफिया कुरेशी यांची माहिती
- Rashtriya Swayamsevak Sangh : देशविरोधी षड्यंत्रांना यश मिळू देऊ नका! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे देशवासीयांना आवाहन
- IPL 2025 Postponed : भारत-पाकिस्तान तणावाचा आयपीएलला फटका, स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित