भाजपचे केंद्रीय नेतृत्व फक्त फडणवीस + शिंदेंना “त्याग” करायला लावेल का??, आता अजितदादांचे काय करेल??

भाजपचे केंद्रीय नेतृत्व फक्त फडणवीस + शिंदेंना “त्याग” करायला लावेल का??, आता अजितदादांचे काय करेल??

नाशिक : महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या महाविजयानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली, तसेच अजित पवार यांनी देखील उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.Now ajit pawar has to make political sacrifice

भाजपचे केंद्रीय नेतृत्व आणि आपल्या शिवसेनेतल्या दबावामुळे एकनाथ शिंदे यांनी “राजकीय त्याग” करून मुख्यमंत्री पद सोडून उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. देवेंद्र फडणवीस यांनी 2022 मध्ये केलेल्या “राजकीय त्यागाची” एकनाथ शिंदे यांनी परतफेड केली. किंबहुना त्यांना ती करावी लागली.



एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री व्हायला राजी होते, पण गृह खाते हवे या मुद्द्यावर ते अडून बसल्याचे बोलले गेले. शेवटी बरीच भवती न भवती होऊन एकनाथ शिंदेंचा उपमुख्यमंत्री पदी शपथविधी झाला. त्याच्या रसभरीत कहाण्या माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्या. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना अजित पवारांना हाताळणे सोपे, पण एकनाथ शिंदेंना हाताळणे “हँडल विथ केअर” असेल, असा इशारा माध्यमांनी फडणवीसांना दिला.

माध्यमांच्या या इशाऱ्यामध्ये काय तथ्य असायचे ते असो, पण प्रश्न त्या पलीकडचे आहेत, ते म्हणजे ज्या भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाच्या छत्रछायेखाली नवे फडणवीस सरकार स्थापन झाले, त्यामध्ये फक्त एकनाथ शिंदे यांनीच “राजकीय त्याग” करायचा का?? आणि त्याआधी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने सांगितले म्हणून फक्त देवेंद्र फडणवीस यांनी “राजकीय त्याग” करायचा का??, भाजप नेतृत्वाचे एवढ्यावरच समाधान होईल का?? या तिन्ही प्रश्नांची उत्तरे नीट विचार केला, तर नकारार्थी आहेत.

आता पाळी अजितदादांच्या त्यागाची

भाजपचे केंद्रीय नेतृत्व फक्त शिंदे फडणवीस यांना “त्याग” करायला लावून अजितदादांना हवी ती मलई खाऊ देतील आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये त्यांचा तथाकथित रुबाब जसाच्या तसा टिकवतील, ही सुतराम शक्यता नाही. वेळेची नजाकत ओळखून अजितदादांनी भाजपच्या मुख्यमंत्र्याला सुरुवातीलाच पाठिंबा देऊन टाकला हे खरे असले, तरी त्या मागची वस्तुस्थिती हीच आहे की, त्यांनी आपली खरी राजकीय मर्यादा ओळखली. पण म्हणून अजितदादांकडून भाजपचे नेतृत्व कोणता “राजकीय त्याग” करूनच घेणार नाही असे मानणे ही चूक ठरेल. किंबहुना फडणवीस आणि शिंदे यांच्या “राजकीय त्यागा”नंतर भाजपचे नेतृत्व आता पुढचा “त्याग” अजित पवारांना करायला लावेल, ही राजकीय अपरिहार्यता लवकरच दिसण्याची दाट शक्यता आहे.

कदाचित मंत्रिमंडळ रचनेत आणि खाते वाटपात अजितदादांना करायला लागलेल्या “त्यागा”चे प्रतिबिंब लगोलग पडल्याचे देखील दिसेल. मंत्री पदासाठी अजितदादा देतील ती यादी जशीच्या तशी फायनल होईल का??, हा सवाल आहे आणि तिथे मुख्यमंत्र्यांचा अधिकार म्हणून देवेंद्र फडणवीस कात्री चालवण्याची दाट शक्यता आहे. त्यातूनच “कलंकीत चेहरे” मंत्रिमंडळात नको, हा विषय बातम्यांच्या रूपात आधीच समोर आणला गेला आहे. हा इशारा एकनाथ शिंदे यांच्यापेक्षा अजित पवार यांच्यासाठी “काफी” आहे.

Now ajit pawar has to make political sacrifice

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023